मुलगी झाली म्हणून पतीने पत्नीसोबत केलं असं काही…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  मुलगी झाल्याच्या कारणावरून पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पत्नी रात्री झोपेत असताना पतीने हे कृत्य केल्याचे समोर समोर आले आहे. मावळ तालुक्यातील चंदनवाडी – चांदखेड येथे घडली आहे. चांगुणा योगेश जाधव (वय २०, रा. चंदनवाडी, चांदखेड, ता. मावळ) असे खून झालेल्या पत्नीचे नाव … Read more

रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मुख्यमंत्री …

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :-  राज्यात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय अजून झाला नाही.या संदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्स आणि आरोग्य विभाग यांच्याशी योग्य वेळी चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. ते जालन्यात बोलत होते. केंद्राने केरळ आणि महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लावावी अशी शिफारस केलेली आहे मात्र मुख्यमंत्रीच याबाबत निर्णय … Read more

शुद्धीवर येऊन बोला, मंदिरं बंद ठेवण्याचा आदेश केंद्राचाच

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी भाजप आज राज्यातील विविध भागात शंखनाद आंदोलन करत आहे. त्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपला चांगलेच सुनावले आहे. मंदिरं बंद करण्याचा निर्णय आमचा नाही. हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. आम्ही फक्त केंद्राच्या सूचनांचं पालन करत आहोत, असं सांगतानाच भाजपने शुद्धीत येऊन … Read more

आता ‘ह्या’ दोन मोठ्या बँकांनी एफडीचे व्याजदर बदलले ; जाणून घ्या फायदा होणार की तोटा

कॅनरा बँक आणि आयडीबीआय बँकेने त्यांचे व्याजदर बदललेत. कॅनरा बँक आणि आयडीबीआय बँकेने मुदत ठेवींचे दर बदललेत. पूर्वीच्या तुलनेत आता दोन्ही बँकांचे दर बदललेत. त्यामुळे नवीन ग्राहक असो की जुने, हे नवे दर पाहिले पाहिजेत. यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे फायदे आणि तोटे यांची कल्पना येईल. 1) कॅनरा बँक असे असतील नवे व्याजदर :- – 7 … Read more

अबब! ‘ह्या’ प्रॉड्युसरने पॉर्न पाहण्याच्या नादात उडवले कंपनीचे 1 कोटी, काय आहे प्रकरण? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- समाजात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. अनेकदा अशा घटना घडतात कि ते वाचून आपलेच डोके बंद पडते. एखाद्या व्यक्तीस कधी कधी अशी व्यसने जडतात की त्या व्यवसानापायी ते सर्वस्व गमावून बसतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रोड्युसरने ऑनलाइन अॅडल्ट शोचाण्डात एक कोटी रुपये … Read more

अखेर बाळासाहेब थोरातांनी घेतला पुढाकार ! संगमनेरच्या वैभवात पडणार भर !

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- संगमनेर तालुक्यात वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र आरटीओ कार्यालय श्रीरामपूरला असल्याने संगमनेर-अकोले-राजूरच्या वाहन धारकांना ते दूरचे आहे. संगमनेर मध्यवर्ती ठिकाण असल्याने दोन तालुक्यातून संगमनेरात आरटीओ कार्यालय व्हावे, अशी मागणी वाढल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतला आहे. याबाबत लवकर प्रस्ताव सादर होणार आहे. मंत्री थोरात यांच्या मंत्रालयातील … Read more

जातीवाचक शिवीगाळ केल्याने तिघांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- जागेची मोजणी सुरू असताना जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी केल्याबद्दल तिघांवर शहर पोलिसांनी शनिवारी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजता शहरातील चैतन्यनगर येथे घडली. या घटनेने उलट-सुलट चर्चेला उधाण आले.जया राहुल डोळस (४८, चैतन्यनगर) व त्यांचा भाऊ दलित पँथरचे शहराध्यक्ष राजू यादव खरात हे जागेची मोजणी … Read more

कोरोना काळातील रक्ताचा तुटवडा भरुन काढणे युवकांची जबाबदारी

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- रक्तदान हेच जीवनदान आहे. रक्तदानामुळे अपघातग्रस्त रुग्णांसह रक्तस्त्राव, प्रसुतीकाळ, शस्त्रक्रिया या अशावेळी रक्ताची गरज भासते आणि अशा रुग्णांना आपण केलेले रक्तदान हे जीवनदान ठरते. तेव्हा कोरोना काळातील तुटवडा भरुन काढण्यासाठी युवकांनी रक्तदान करा, शिबीराचे आयोजन करा ही युवकांची जबाबदारी आहे, असे आवाहन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांनी केले. प्रभाग … Read more

लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनच्यावतीने पोलिस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन अहमदनगर च्यावतीने रक्षाबंधन कार्यक्रम डीएसपी ऑफिसमध्ये घेण्यात आला. लायन्स क्लबचे अध्यक्षा ला. संपूर्णा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला. लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष ला.श्रीकांत मांढरे, ला.कल्पना ठुबे, ला.सविताताई मोरे, ला. छायाताई रजपूत, ला. मंदाकिनी वडगणे, ला. सुरेखाताई कडूस यांनी पोलिस अधिक्षक मनोज … Read more

‘महावीर क्रिकेट लिग’चा राज रॉयल्स मानकरी सोशल मिडियाच्या जमान्यात युवकांना मैदानाकडे वळविण्याची गरज – विक्रम राठोड

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  महावीर ग्रुप व श्री महावीर प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महावीर क्रिकेट लिग’च्या अंतिम सामना राज रॉयल्स विरुद्ध युसीसी मध्ये झाला. या अटीतटीच्या सामान्यात राज रॉयल्स संघांच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन करत विजयी ठरले. विजेत्या संघास युवा सेनेचे विक्रम राठोड यांच्या हस्ते चषक देण्यात आला. याप्रसंगी महावीर ग्रुपचे … Read more

राजकारणापेक्षा समाजकारणाकडे झुकणारे विनायक देशमुख पक्षाचे निष्ठावान

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  श्री.विनायक देशमुख यांचे पक्षकार्य हे राजकारणापेक्षा समाजकारणाकडे झुकणारे असून, समाजसेवक अण्णा हजारे आणि पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विचाराचा वारसा ते या पदाच्या माध्यमातून पुढे नेत आहे. त्यांच्याकडे वैचारिक बैठक असून, संकुचित वृत्तीने गटबाजीकडे त्यांनी कधी लक्ष दिले नाही. पण पक्षकार्य ते निष्ठेने करत असून, राज्यात ठिकठिकाणी त्यांनी आपल्या … Read more

राज्यात प्रथमच पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक लोणी येथे क्लाऊड कॉम्प्युटींग अँण्ड बिग डेटा अभ्यासक्रम

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील तंत्रनिकेतनमध्ये यावर्षीपासून क्लाऊड कॉम्प्युटींग अँण्ड बिग डेटा आणि मेकॅट्रॉनिक्स हे दोन नविन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी परवानगी दिली असल्याची माहीती तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. विजय राठी यांनी दिली. सातत्याने नविन तंत्रज्ञान विकसित होत असून विविध कंपन्यांमधून आवश्यक असलेल्या नविन … Read more

भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरण करुन किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करावे

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  भिंगार छावणी हद्दीतील केंद्रीय रक्षा मंत्रालयाच्या ताब्यात असलेल्या भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरणाचे काम सुरु करुन या ऐतिहासिक किल्ल्यास राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याच्या मागणीचे निवेदन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आले. पर्यटन राज्यमंत्री तटकरे या अहमदनगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता त्यांची भेट घेऊन भिंगार … Read more

माजी महापौर व शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांना प्रदेश सचिव पदी बढती

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारिणीची घोषणा काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सोनिया गांधी जी व काँग्रेसचे नेते मा. राहुल गांधी जी यांच्या मान्यतेने करण्यात आली. अहमदनगर शहरातून माजी महापौर व शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांची ”सचिव” पदी नियुक्ती करण्यात आली. पक्ष नेतृत्वाने माझ्यावर पक्ष वाढीसाठी काम करण्याची … Read more

मनपाकडून माफी नाही; नगरकरकरांनो घरपट्टी, पाणीपट्टी भरा..!

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  कोरोना आपत्ती काळातील घरपट्टी, पाणीपट्टी माफ करावी, अशी मागणी शहरातील विविध सामाजिक संघटनांनी केली, परंतु महापालिकेने घरपट्टी, पाणीपट्टी माफ करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम १३३ (अ) नुसार ‘नैसर्गिक आपत्ती’मध्ये कोविड १९ हा विषाणूजन्य आजार (साथरोग) असल्याने तो या कलमानुसार नैसर्गिक आपत्तीच्या व्याख्येत लागू होत … Read more

संघटीत गुन्हे करणार्‍या 15 टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पदभार स्वीकारल्यापासून संघटीत गुन्हे करणार्‍या 15 टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार केल्या आहे. त्याचबरोबर वैयक्तिक गुन्हे करणारे 30 सराईत गुन्हेगारही हद्दपार केले आहेत. तसेच गुन्ह्यात शिक्षा भोगून आल्यानंतर गुन्हे करणार्‍या 11 गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले असल्याचे जिल्हा पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार, संघटीत … Read more

कर्मचारी संपावर गेले तरी नागरिकांचे कुठलीच कामे प्रलंबित राहणार नाही – ज्योती देवरे

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :-  पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मनमानी व दडपशाही धोरणाच्या विरोधात महसूल कर्मचार्‍यांनी 25 ऑगस्टपासून काम बंद आंदोलन करत संप केला आहे. तर दुसरीकडे कर्मचारी संपावर गेले असले तरी नागरिकांची कोणतीच कामे प्रलंबित राहणार नाही याची काळजी मी स्वतः घेणार आहे, अशी माहिती पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली … Read more

नेवासा तालुक्यातील ‘या’ गावात पाच दिवस कडकडीत बंद

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2021 :- करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून करोना प्रादुर्भावर प्रतिबंध घालण्यासाठी नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे शनिवार दि. 28 ऑगस्टपासून पाच दिवस गावात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाची साखळी तोडण्याकरीता गावातील करोना नियंत्रण समितीने हा निर्णय घेतला आहे. काय सुरु? काय बंद राहणार? जाणून घ्या बेळपिंपळगावात 28 ऑगस्ट ते … Read more