Cheapest Tabs : जबरदस्त फीचर्स आणि मजबूत बॅटरीसह येतात हे स्वस्त टॅब, किंमत फक्त…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheapest Tabs : मार्केटमध्ये अनेक कंपन्यांचे टॅब उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या किमती जास्त असल्याने अनेकांना ते खरेदी करता येत नाहीत. पण बाजारात असे काही टॅब आहेत ज्यांच्या किमती 30 हजारांपेक्षा कमी आहेत. या टॅबमध्ये जबरदस्त फीचर्स आणि मजबूत बॅटरी पॅक दिला जात आहे.

Apple iPad 9th Gen

तुम्हालाही Apple कंपनीचा शानदार टॅब खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी Apple iPad 9th Gen उत्तम पर्याय आहे. यामध्ये 10.2 इंच स्क्रीन, A13 बायोनिक चिप, 12MP फ्रंट कॅमेरा फीचर्स देण्यात येत आहेत. हा टॅब iPadOS 15 काम करतो. iPad 9th Gen टॅबची किंमत 25,999 रुपये आहे.

Lenovo Tab P12

बजेट कमी असेल आणि सर्वोत्तम कंपनीचा टॅब खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी Lenovo Tab P12 चा उत्तम पर्याय मार्केटमध्ये उपलब्ध आहे. Lenovo Tab P12 ची किंमत 26,999 रुपये आहे.

8GB RAM, 256GB स्टोरेजसह हा टॅब सादर करण्यात आला आहे. 8MP बॅक कॅमेरा, 13MP फ्रंट कॅमेरा आणि 10,200mAh बॅटरी या टॅबमध्ये देण्यात आली आहे. तसेच टॅबमध्ये 12.7 इंचाचा LTPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.

Samsung Galaxy Tab S6 Lite

सॅमसंग कंपनीकडून कमी बजेटमध्ये त्यांचा Galaxy Tab S6 Lite हा टॅब सादर करण्यात आला आहे. या टॅबची किंमत 28,999 रुपये आहे. या टॅबमध्ये 10.40 इंच स्क्रीन, 1.7GHz ऑक्टा-कोर चिपसेट, 7040mAh बॅटरी, 4GB रॅम, 64GB स्टोरेज, 8MP बॅक कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Xiaomi Pad 6

Xiaomi कंपनीकडून त्यांचा Pad 6 हा टॅब अगदी 26,999 रुपये किमतीमध्ये सादर करण्यात आला आहे. टॅबमध्ये 144Hz रिफ्रेश रेट, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देण्यात आला आहे.

टॅबमध्ये 8GB रॅम, 256GB स्टोरेज, 13MP बॅक कॅमेरा, 8MP फ्रंट कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग स्पोर्ट देण्यात आले आहे. टॅबला 8840mAh बॅटरी पॅक ऑफर करण्यात आला आहे.

Realme Pad

Realme स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचा Pad टॅब 25,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 10.95 इंच स्क्रीन, 60Hz डिस्प्ले, क्वाड स्पीकर्स, स्नॅपड्रॅगन 695 SoC चिपसेट, 6GB रॅम, 128GB स्टोरेज आणि 33W फास्ट चार्जिंगसह 8340mAh बॅटरी पॅक देण्यात आला आहे.