iPhone 13 : स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी! ‘या’ ठिकाणी मिळत आहे iPhone 13 खरेदीवर 22999 रुपयांची सवलत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 13 : जर तुम्हाला कमी किमतीत आयफोन खरेदी करायचा असेल तर Flipkart वर चालू असणारा बिग सेव्हिंग डेज तुमच्यासाठी आहे. तुम्ही या सेलमधून iPhone 13 हा फोन मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता.

तुम्हाला 128GB स्टोरेज असणारे iPhone 13 23 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत आहे. या फोनची मूळ किंमत 69,900 रुपये इतकी आहे. परंतु तो तुम्ही मिळत असणाऱ्या ऑफर्समुळे कमी किमतीत खरेदी करू शकता. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

मिळणार 11,000 रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट

iPhone 13 या फोनचे 128GB स्टोरेज आहे. जे Flipkart वर 69,900 रुपयांच्या मूळ किमतीसह लिस्ट करण्यात आले आहे. परंतु तुम्ही हा फोन केवळ 58,999 रुपयांच्या 11,000 च्या डिस्काउंटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. परंतु आता फ्लिपकार्टने या सेलमध्ये ऑफर्सचा पाऊस पाडला आहे.

एक्सचेंज ऑफर

या फोनवर उपलब्ध असणाऱ्या बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला एकूण 1000 रुपयांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. इतकेच नाही तर या फोनवर 35,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस दिला जात आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे जुना फोन एक्सचेंजसाठी असल्यास तुम्हाला 35 हजारांपर्यंत सवलत मिळू शकते. परंतु जर तुम्हाला बँक आणि एक्सचेंज ऑफर या दोन्हींचा लाभ मिळाला, तर या फोनची किंमत केवळ 22,999 रुपये असेल.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Apple iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन Apple च्या शक्तिशाली A15 प्रोसेसरने सुसज्ज असून या स्मार्टफोनमध्ये 12-मेगापिक्सेल लेन्ससह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो 4K डॉल्बी व्हिजन HDR व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे. तसेच या फोनमध्ये सेल्फीसाठी नाईट मोडसह 12-मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन पूर्ण चार्ज करून 17 तास व्हिडिओ पाहता येईल असे कंपनीचे मत आहे,