iPhone 14 series : शेवटची संधी! iPhone 14 सीरीजवर मिळत आहे 50 हजार रुपयांपर्यंत सवलत, जाणून घ्या ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone 14 series : Apple ने आपली काही दिवसांपूर्वी iPhone 14 सीरीज लाँच केली आहे. या सीरीजला मार्केटमध्ये खूप जास्त मागणी आहे. जी तुम्ही आता कमी किमतीत खरेदी करू शकता. यावर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत दिली जात आहे.

आयफोन 14 प्लस, iPhone 14 Pro Max आणि आयफोन 14 प्रो हे फोन 50 हजार रुपयांपर्यंतच्या सवलतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर चालणाऱ्या बिग बचत धमाल सेलमध्ये तुम्हाला अशी शानदार ऑफर मिळत आहे. जाणून घ्या सविस्तर ऑफर.

आयफोन 14 प्लस

हा Apple फोन 128 GB अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज असून त्याची मूळ किंमत 89,900 रुपये इतकी आहे. या सेलमध्ये, तुम्हाला तो एकूण 14% डिस्काउंटनंतर 76,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. इतकेच नाही तर या फोनवर 50 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही देण्यात येत आहे.

परंतु हे लक्षात ठेवा की फोनवर मिळणारी एक्सचेंज डिस्काउंट तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड यावर अवलंबून असणार आहे. या फोनमध्ये 6.7 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळत असून फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा तसेच 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जात आहे.

iPhone 14 Pro Max

कंपनीच्या या फोनच्या 128 GB स्टोरेज वेरिएंटची मूळ किंमत 1,39,900 रुपये इतकी आहे. तर या सेलमध्ये डिस्काउंटनंतर तुम्हाला 1,27,999 रुपयांत खरेदी करता येईल. त्यानंतर जर तुम्ही HDFC बँकेच्या कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत देखील मिळेल.

एक्सचेंज ऑफरमध्ये तुम्हाला या फोनची किंमत 50 हजार रुपयांपर्यंत कमी करता येईल. सवलतीचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की ही सवलत तुमच्या जुन्या फोनची स्थिती आणि ब्रँड यावर अवलंबून असणार आहे. तर याच्या फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर या फोनमध्ये तुम्हाला 48-मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेरासह 12-मेगापिक्सलचे दोन रियर कॅमेरे पाहायला मिळतात.

आयफोन 14 प्रो

आयफोन 14 प्रो 128 GB फोनवर सेलमध्ये 7% सवलत देण्यात येत आहे. त्याची मूळ किंमत 1,29,900 रुपये इतकी आहे, परंतु सध्या रु.1,19,999 मध्ये हा फोन तुमचा असू शकतो. इतकेच नाही तर HDFC कार्ड वापरकर्त्यांना फोनवर 3,000 रुपयांची बँक सवलत देखील मिळू शकते. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 50 हजार रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करता येईल. कंपनीकडून या फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेल आणि सेल्फी कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा आहे.