OnePlus Smartphone Offer : अशी ऑफर पुन्हा नाही ! वनप्लसचा 30 हजारांचा स्मार्टफोन खरेदी करा फक्त 14 हजारांमध्ये…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

OnePlus Smartphone Offer : वनप्लस स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून त्यांचे अनेक महागडे स्मार्टफोन भारतीय मार्केटमध्ये सादर केले आहेत. त्यांच्या स्मार्टफोन ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र कमी बजेट ग्राहकांना वनप्लसचे स्मार्टफोन खरेदी करता येत नाहीत.

तुम्हालाही वनप्लसचा शानदार स्मार्टफोन कमी बजेटमध्ये खरेदी करायचा असेल तर चांगली संधी आहे. कारण वनप्लसच्या सर्वोत्तम स्मार्टफोन Nord N20 SE वर ई-कॉमर्स वेबसाईट Amazon कडून मोठी ऑफर देण्यात येत आहे.

तसेच वनप्लस स्मार्टफोन निर्मात्या कंपनीकडून आता त्यांचे कमी बजेट स्मार्टफोन सादर करण्यात सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना वनप्लसचे उत्तम फोन कमी बजेटमध्ये आता खरेदी करता येऊ शकतात.

OnePlus Nord N20 SE स्मार्टफोनच्या Jade Wave मॉडेलवर सध्या Amazon कडून 52 टक्के बंपर सूट देण्यात येत आहे. 4GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनची मूळ किंमत 29,999 रुपये आहे.

मात्र Amazon कडून ऑफर देण्यात येत असल्याने हा स्मार्टफोन अगदी 14,350 रुपयांना उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन तीन रंग पर्यायामध्ये सादर करण्यात आला आहे.

तुमचे बजेट कमी असेल तर 698 रुपयांच्या EMI वर देखील हा स्मार्टफोन खरेदी करू शकता. OnePlus च्या Nord N20 SE स्मार्टफोनवर फक्त 29 फेब्रुवारीपर्यंतच ऑफर देण्यात येत आहे.

OnePlus Nord N20 SE वैशिष्ट्ये

OnePlus Nord N20 SE स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये Octacore MediaTek Helio G35 चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे.

हा फोन Android 12 वर आधारित OxygenOS 12.1 वर चालतो. स्मार्टफोनमध्ये 5000mAh शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी चार्जिंग करण्यासाठी 33W SUPERVOOC चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

OnePlus Nord N20 SE स्मार्टफोनमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सरसह दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 8MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे.