Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केले दोन नवीन 5G फोन, 50MP सेल्फी कॅमेरासह असतील ‘ही’ खास वैशिष्ट्ये…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Samsung Galaxy : सॅमसंग कपंनीने नुकताच आपला M55 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. मात्र, कंपनीने हा हँडसेट अद्याप भारतात लॉन्च केलेला नाही. कंपनीने हा फोन ब्राझीलमध्ये लॉन्च केला आहे. Samsung चा नवीन फोन Android 14 वर आधारित One Ui 6.0 वर काम करतो. यात AMOLED डिस्प्ले आहे.

यासोबतच या ब्रँडने Galaxy M15 देखील लॉन्च केला आहे. Galaxy M55 बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसर सह येतो. यात 5000mAh बॅटरी आहे. तर M15 मध्ये कंपनीने 6000mAh बॅटरी आणि Dimensity 6100 प्रोसेसर दिला आहे.

Samsung Galaxy M55 5G आणि M15 5G ची किंमत

हा फोन भारतात लॉन्च केला गेला नसल्यामुळे, त्याच्या भारतीय किंमतींबद्दल कोणतीही माहिती नाही. तथापि, ब्राझीलमध्ये ब्रँडने हा हँडसेट BRL 3,199 (अंदाजे 53 हजार रुपये) च्या किमतीत लॉन्च केला आहे. ही किंमत Galaxy M55 च्या 8GB रॅम 256GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे.

हा फोन दोन रंग पर्यायात लॉन्च करण्यात आला आहे. तर Galaxy M15 5G ची किंमत BRL 1,499 (सुमारे 25 हजार रुपये) पासून सुरू होते. ही किंमत फोनच्या 4GB रॅम 128GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे.

वैशिष्ट्य काय आहेत?

Samsung Galaxy M55 5G ड्युअल सिम सपोर्टसह येतो. हे Android 14 वर आधारित One UI 6.1 वर कार्य करते. यात 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरवर काम करतो.

मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने या फोनचा स्टोरेज वाढवता येतो. यात 50MP प्राथमिक लेन्स, 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. समोर कंपनीने 50MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. हँडसेट 5000mAh बॅटरी आणि 45W चार्जिंग सपोर्टसह येतो.

Galaxy M15 5G मध्ये 6.5-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे. फोन MediaTek Dimensity 6100 प्रोसेसरसह येतो. यात 50MP 5MP 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने फ्रंटला 13MP सेल्फी कॅमेरा दिला आहे. तर हे डिव्हाइस 6000mAh बॅटरीसह येते.