Ahmednagar Rain Alert : अहमदनगर जिल्ह्यासाठी चार दिवस पावसाचा अलर्ट जारी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Rain Alert : भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार अहमदनगर जिल्हयात सोमवार दि.२५ ते गुरुवार दि. २८ या कालावधीत वीजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असून अहमदनगर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हयातील नागरीकांना दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थीतीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर राहावे.

मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विदयुत / दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या / लोबणाऱ्या केबल्सपासून दूर रहावे, स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.