अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीसह महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा बदल पाहायला मिळतं आहे. राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट येणार अशी शक्यता आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा देखील अंदाज देण्यात आला आहे. काल राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसला.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या पावसाची हजेरी पाहायला मिळाली. काल जिल्ह्यातील मालेगाव शहरात देखील हलका पाऊस झाला. यामुळे काही काळ शहरवासीयांना गारवा अनुभवायला मिळाला.परंतु नंतर उकाड्यात आणखी वाढ झाली.

एकंदरीत सध्या राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येत आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचे सत्र सुरू आहे. आज देखील हवामान खात्याने राज्यातील विदर्भ विभागात उष्णतेची लाट येणार असा अंदाज दिला असून विदर्भासहित राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

आज महाराष्ट्रातील जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसणार असा अंदाज आयएमडीने दिलेला आहे. यामुळे निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. एकीकडे विदर्भात पावसाचे सत्र सुरू आहे तर दुसरीकडे तिथेच उष्णतेच्या लाटेचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील अकोल्यात सर्वाधिक तापमानाची नोंद केली जात आहे. देशातील सर्वाधिक तापमान अकोला मध्ये नोंदवले गेले आहे. दोन दिवसांपूर्वी येथील तापमान 42.8°c पर्यंत पोहोचले होते.

आज देखील अकोल्याचे तापमान 42.6°c पर्यंत नमूद करण्यात आले आहे. यावरून तेथे उष्णतेची लाट आल्याचे स्पष्ट होत आहे. रात्री देखील विदर्भात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे.

विदर्भाप्रमाणेच उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातही तापमानाने नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. पण, आज राज्यातील काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते असा अंदाज आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अर्थातच 30 मार्च 2024 ला राज्यातील मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, धाराशिव, विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या 19 जिल्ह्यात वादळी पावसाची शक्यता आहे.

यामुळे येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दुसरीकडे यवतमाळ, अमरावती, अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे येथील नागरिकांनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. खूपच आवश्यकता असेल तेव्हाच या भागातील नागरिकांनी बाहेर निघावे अन्यथा घरातच रहावे नाहीतर उष्णतेची लाट जीवावर सुद्धा बेतू शकते.