मुंबई, ठाणे, अहमदनगर, नासिक, सोलापूर जिल्ह्यात विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा ! तुमच्या जिल्ह्यात पाऊस पडणार का ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain : भारतीय हवामान विभागाने काल मान्सूनचे राज्यात आगमन झाल्याची मोठी घोषणा केली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, काल राज्यातील दक्षिण कोकणात अर्थातच रत्नागिरी मध्ये मान्सून पोहोचला.

मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आता दक्षिण कोकणात आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रमध्ये मोसमी पावसाला सुरुवात देखील झाली आहे. याव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यात पूर्व मोसमी पाऊस साठी देखील पोषक हवामान तयार झाले आहे.

मात्र विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, वर्धा या विदर्भातील तीन जिल्ह्यात उष्णतेची लाट येईल असा अंदाज आहे.

दरम्यान काल राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाड्यातील काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. आज अर्थातच 12 जून 2023 रोजी देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

हे पण वाचा :- टोमॅटो लागवड : महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या ‘या’ जातीची लागवड करा, 60 टनापर्यंत मिळणार उत्पादन

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. निश्चितच, गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या या भागातील नागरिकांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

बळीराजा देखील या पावसामुळे सुखावणार आहे. वास्तविक, राज्यात मान्सूनचे आगमन जवळपास चार दिवस उशिराने झाले आहे. दरवर्षी मान्सून सात जूनला तळकोकणात अर्थातच दक्षिण कोकणात दाखल होतो.

त्यानंतर मग मान्सून मुंबईमध्ये जातो आणि त्यानंतर सह्याद्रीचा माथा ओलांडून संपूर्ण महाराष्ट्रभर मानसून पसरतो. यावर्षी मात्र मान्सूनची चार दिवस उशिराने आगमन झाले यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. 

हे पण वाचा :- पाऊस केव्हा आणि किती पडणार याबाबत पशु-पक्षी देतात ‘हे’ संकेत; वाचा याविषयी सविस्तर

पण भारतीय हवामान विभागाने मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक परिस्थिती असल्याचा दावा केला असून मान्सून येत्या काही तासात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असे देखील मत आय एम डी ने वर्तवल आहे. त्यामुळे पुढील काही तासात राज्यातील बहुतांशी भागात मोसमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दरम्यान भारतीय हवामान विभागाने आज अर्थातच 12 जून 2023 रोजी उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि मुंबई, खान्देश विभागातील नंदूरबार, धुळे, जळगाव आणि मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, सोलापूर, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, सर्पदंश झाला तर घाबरू नका, ‘हे’ काम करा; पण सापाने चावा घेतल्यास ‘या’ गोष्टी करणे टाळा, नाहीतर….