Maharashtra Weather: नवीन वर्षात राज्यावर पावसाचे सावट! वाचा कुठे बरसणार पावसाच्या सरी व कुठे वाढेल थंडी?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Weather:- सकाळी सकाळी पसरणारी गुलाबी थंडी आणि चोहोकडे असणारी धुक्याची चादर ही परिस्थिती सगळीकडे आहे व नवीन वर्षाची सुरुवात देखील झालेली आहे. तसेच राज्यामध्ये पाण्याच्या उपलब्धतेनुसार शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची पेरणी देखील केलेली आहे.

परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील हवामान मात्र सातत्याने बदलत असताना दिसून येत आहे. कुठे ढगाळ हवामान तर कुठे कडाक्याची थंडी अशी परिस्थिती असून राज्यांमध्ये केल्या काही दिवसापासून थंडीने देखील चांगल्यापैकी जोर पकडला आहे.

परंतु गेल्या दोन ते चार दिवसापासून थंडी देखील गायब झालेली असून काही ठिकाणी राज्यात पावसाची शक्यता दिसून येत आहे. याबाबत हवामान विभागाने देखील महत्त्वाची माहिती दिली असून सध्या महाराष्ट्राचे हवामान कसे राहील याबद्दलची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

 राज्याच्या काही भागात बरसणार पावसाच्या सरी

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये किमान तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता असून विदर्भाच्या पूर्व भागात मात्र थंडीचा कडाका कायम राहणार आहे. परंतु यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि कोकणपट्ट्यामध्ये पावसाची शक्यता देखील हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

सध्या जर आपण हवामानाची स्थिती पाहिली तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येतील अशी शक्यता आहे. त्यामुळे आठवड्याच्या मध्यापासून राज्यावर पावसाचे सावट असेल.

या आठवड्याच्या शेवटी या वातावरणीय प्रणालीला वेग येणार असून कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी बरसतील अशी माहिती हवामाना विभागाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.राज्याच्या काही भागांमध्ये कमाल व किमान तापमानामध्ये देखील फार मोठा फरक दिसून येत आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमान हे रत्नागिरी येथे 35 अंश डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले तर गोंदिया या ठिकाणी सर्वात किमान तापमान 12.4 अंश डिग्री सेल्सिअस नोंदविण्यात आले.

सध्या राज्यांमध्ये पावसासाठी पूरक वातावरण तयार होताना दिसून येत असून येणाऱ्या काही दिवसांसाठी किमान तापमानात दोन ते चार अंशांची वाढ होण्याची शक्यता देखील आहे. पावसाच्या सरींची शक्यता असल्यामुळे दिवसा हवेत गारवा जाणवेल अशी देखील शक्यता आहे.

परंतु मुंबई आणि नवी मुंबईत मात्र तापमानात होणारी वाढ कायम राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात त्या ठिकाणी उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागतील.