अहमदनगर :- पोलिस कर्मचाऱ्यानेच युवतीला घरात कोंडून मारहाण करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पीडित युवतीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी पोलिस कर्मचारी योगेश धाईंजे व त्याच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यानेच हा प्रकार केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. धाईंजे हा एका महिन्यापासून पीडित युवतीचा पाठपुरावा करत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता.
अश्लील शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन तो युवतीशी वारंवार करत होता. माझ्या आईला तुझ्याशी बोलायचे आहे,
असा बहाणा करून तो युवतीला त्याच्या पोलिस मुख्यालयातील घरी घेऊन गेला.
घरी गेल्यानंतर युवतीला कोंडून घेत लाकडी दांडक्याने मारहाण केली. तिचा मोबाइलदेखील फोडून जिवे मारण्याची धमकी दिली.
त्याच्या आईने धाईंजे याला समजावून सांगण्याऐवजी युवतीलाच शिवीगाळ करत घरात कोंडून ठेवले.
याप्रकरणी युवतीच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी धाईंजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
- MG च्या ‘या’ SUV कारवर मिळतोय तब्बल 2.50 लाखांचा डिस्काउंट !
- म्हातारपणही आनंदात घालवता येणार ! प्रत्येक महिन्याला मिळणार 5 हजार 550 रुपयांची इन्कम, पोस्टाच्या ‘या’ योजनेत एकदा गुंतवणूक कराच
- Tata कंपनीच्या ‘या’ दोन SUV वर मिळतोय तब्बल 1.25 लाखांचा डिस्काउंट ! कधीपर्यंत सुरू राहणार ऑफर ?
- बैलजोडीसह मशागतीचा खर्च वाढला ! सालगडीही लुप्त, दुधासह कांद्याला भाव मिळेना, शेतकऱ्यांची ‘दीन’ अवस्था
- Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘हा’ तालुका बनतोय उसाच्या रसाची ओळख ! २७८ रसवंतिगृहे, लाखोंची होते उलाढाल