महाराष्ट्र दिनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते ‘असे’ झाले ध्वजारोहण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले.

पालकमंत्री मुश्रीफ हे काल गुरुवारी अहमदनगरमध्ये आले होते. आज १ मे महाराष्ट्र दिना निमित्ताने ध्वजारोहण पार पाडल्यानंतर पालकमंत्री लगेच पुणे मार्गे कोल्हापूरकडे रवाना झाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी कोणताही संदेश न देता तसेच औपचारिक चहापाण्याला फाटा देत ध्वजारोहण केले आणि ते पुढे रवाना झाले.

या ध्वजारोहण कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग आदी मोजके वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment