पत्ते खेळताना आयुष्याचाच पत्ता झाला कट !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पाइपलाइन रस्त्यावरील तागडवस्ती येथे एकाचा खून झाला. पत्ते खेळताना पैशांच्या वादातून हा प्रकार घडला.

नंदकिशोर गणपत मंचरे (५२, तागडवस्ती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

तागडवस्ती भागात काहीजण शनिवारी जुगार खेळत होते. पैशांच्या वादातून त्यांच्यात भांडणे झाली.

त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. मंचरे याला पत्ते खेळणाऱ्या जोडीदाराने दगडाने मारले.

त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सागर पाटील,

उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, तोफखाना ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुलानी यांनी घटनास्थळास भेट दिली.

आरोपी सचिन नानासाहेब भाजने (वय ३३, तागडवस्ती, पाइपलाइन रोड, नगर) याला सायंकाळी अटक करण्यात आली.

जागामालक अशोक भिटे व पत्ते खेळणारे साथीदार अविनाश तागड व दत्तात्रय साळवे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment