भंडारदरा, मुळा पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची हजेरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : पावसाने महाराष्ट्रात सर्वदूर हजेरी लावली आहे. यंदा मान्सून सरासरी ओलांडणार असल्याचे भाकीत हवामान तज्ज्ञांनी वर्तविले आहे. कोकण, मुंबई आदी भागांमध्ये पावसाने हजेरी लावली असतानाच

आता उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा, मुळा पाणलोटात मान्सून सक्रिय झाला आहे. या ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावल्याने दोन्ही धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक होत आहे.

भंडारदरा धरणात गत बारा तासांत 160 दलघफू पाणी दाखल झाले. मुतखेल, रतनवाडी, साम्रद, घाटघर, पांजरे, बारी, वारंघुशी, वाकी, भंडारदरा याठिकाणी आदिवासी शेतकरी बांधवांच्या पावसाविना खोळंबलेल्या भात लागवडीच्या कामाला वेग आला असून

समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भंडारदरा धरणात काल सायंकाळपर्यंत 3004 दलघफू इतका पाणी साठा झाला होता. मुळा पाणलोटातही दिवसभर पावसाचे प्रमाण टिकून असल्याने नदीचा कोतूळ येथील विसर्ग 1273 क्युसेक आहे.

त्यामुळे 26000 दलघफू क्षमतेच्या धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू झाली आहे. काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 38 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुुळे काल सकाळी धरणातील पाणीसाठा 7718 दलघफू झाला होता.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment