चोरटयांनी लुटले चक्क 30 तोळे सोने; या तालुक्यातील घटना

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे सणासुदीचा काळ जवळ आला आणि यातच जिल्ह्यात सर्वत्र चोरटे चांगलेच सक्रिय झाले आहे.

नुकतीच अशीच एक मोठ्या चोरीची घटना श्रीगोंदा शहरात घडली आहे, यामुळे शहरातील नागरिकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीगोंदे शहरातील बालाजीनगरमधील डॉ. विक्रम बलभीम भोसले (कसरे) यांच्या घराचा दरवाजा तोडून कपाटातील तीस तोळे सोने आणि रोख दोन लाख असा एकूण सोळा ते सतरा लाखांचा

मुद्देमाल आणि याच परिसरातील बाळासाहेब जंगले याचे घरातील दीड किलो वजनाचा चांदीचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. मातोश्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. भोसले पत्नीसह बाहेरगावी गेले होते. हॉस्पिटलमागे असलेल्या त्यांच्या घरात कोणी नसल्याचे पाहून चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, रोख रक्कम त्यांनी चोरली. घरात लग्नकार्य असल्याने डाॅक्टरांनी लॉकरमधून काढून आणलेले दागिने घरात ठेवले होते. घरी येण्यास उशीर होत असल्याने त्यांनी नातेवाईकांकडे मुक्काम केला. सकाळी हॉस्पिटलमधील कामगारांना घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले.

याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. डॉ. भोसले यांनी फिर्याद दिली. याच परिसरात बालाजी विहारमध्ये राहणारे प्रा. बाळासाहेब जंगले हे गावाकडे गेले होते. दरवाजा तोडून त्यांच्या घरातील चांदीचे दागिने, देवाच्या मूर्ती अशी अंदाजे दीड किलो वजनाची चांदी लांबवली. या घटनांचा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव तपास करीत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment