महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यानंतर संगमनेरसाठी ६ रुग्णवाहिका !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हा परिषद निधीतून निमगावजाळी, चंदनापुरी, जवळे बाळेश्वर, घारगाव, जवळेकडलग व धांदरफळ खुर्द आरोग्य केंद्रांना ६ रुग्णवाहिका देण्यात आल्या.

यशोधन संपर्क कार्यालयात या रुग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, प्रतापराव ओहोळ, सभापती शंकरराव खेमनर, सुनंदा जोर्वेकर, उपसभापती नवनाथ अरगडे, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, महेंद्र गोडगे,

मिलिंद कानवडे, सीताराम राऊत, विष्णूपंत रहाटळ, बेबी थोरात, निशा कोकणे, अर्चना बालोडे, इंद्रजीत खेमनर, सुरेश झावरे, सुभाष सांगळे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, अ‍ॅड. सुहास आहेर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम,

वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, महेश वावळ, अभिजीत बेंद्रे यांच्या उपस्थितीत झाले. आमदार डॉ. तांबे म्हणाले, संगमनेर तालुक्यातील आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत येणाऱ्या गावांसाठी रुग्णवाहिका अत्यंत गरजेची आहे. यावेळी रुग्णवाहिका चालकांचा सत्कार करण्यात आला.