निलेश लंके स्पष्टच बोलले ! विरोधकांनी हे लक्षात ठेवावे,मी सोपा नाही ! पन्नास वर्षे विखे परिवाराने…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेरसह नगर, पाथर्डी तालुक्यात कुकडी प्रकल्पाचे पाणी भुईदंडाने आणू अशा वल्गना खा.सुजय विखे यांचे आजोबा माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी चाळीस वर्षे केल्या.मात्र ते साध्या नळानेही पाणी आणू शकले नाहीत.अशी घणाघाती टीका आमदार नीलेश लंके यांनी केली. टाकळी ढोकेश्वर येथे जनसंवाद यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

टाकळीढोकेश्‍वरच्या सरपंच अरूणा खिलारी अध्यक्षस्थानी होत्या. आ. लंके म्हणाले की,महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर आपल्या मतदारसंघाला त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला. आजही सुमारे साडेतिनशे कोटी रूपयांचा निधी रोखला आहे. विरोधकांनी हे लक्षात ठेवावे,मी सोपा नाही,लोकसभेचे मतदान झाल्यानंतर रोखलेला निधी मिळालेला असेल.असे आ.लंके यांनी ठणकावून सांगितले.

मला विधानसभेत पाठविल्यानंतर सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. साडेचार वर्षांच्या कालखंडात सर्वाचे समाधान करू शकलो नसलो तरी संपूर्ण कार्यकाळात रात्रंदिवस परीश्रम घेतले.मतदार संघाला न्याय देण्यासाठी अथक आणि प्रामणिक प्रयत्न केले.

प्रत्येक गावात किमान एक कोटी रूपयांचा निधी देण्याचा प्रयत्न केला. विधानसभेची घडी बसलेली असतानाही लोकसभेसाठी विधानसभेचा राजीनामा दिला.आपण मांडलेला डाव मोडला.आता डाव पुन्हा सावरायचा असल्याचे सांगत भावनिक आवाहन लंके यांनी केले.

तालुक्यातील काही असंतुष्ट आत्मे लोकांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आपले भवितव्य आपल्याच हातात आहे. माझा तुमच्यावर व तुमचा माझ्यावर अधिकार आहे.लोकसभा निवडणुकीत आपण झेंडा लावणारच, आपले नाव देशात होणार आहे.

धोका पत्करून आपण पुढे जात आहोत. समोरचा कडा पार करून झेंडा रोवायचा आहे.तालुक्यातील जनतेच्या हाती मताधिक्य आहे. किमान एक लाखांची आघाडी मिळाली पाहिजे. विरोधक इतर तालुक्यात जाऊन तालुक्यात लंके यांना लिड मिळणार नाही असा गैरसमज पसरवत आहेत कारण इतर तालुक्यातही त्यांना प्रतिसाद मिळत नाही असे आ.नीलेश लंके म्हणाले.