ना.बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात रंगली मुशायराची मैफिल ; नामांकित शायर, कवींनी लावली हजेरी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- औचित्य महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे…. पुढाकार शहर जिल्हा काँग्रेस आणि तंजिम-ए-उर्दू-अदबचा… मांदियाळी जमली नगर शहर आणि पुण्यातील नामांकित शायर, कवींची… महसूल मंत्री ना.थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुशायराच्या मैफलीचा मनमुराद आनंद नगरकरांनी या निमित्ताने लुटला.

सर्जेपुरातील रहेमत सुलतान फाउंडेशनच्या सभागृहात पार पडलेल्या या मैफिलीला शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अंकुशराव कानडे, तंजिम-ए-उर्दू-अदबचे अध्यक्ष खलील सय्यद, ज्येष्ठ नगरसेवक नज्जूभाई पैलवान, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, माजी महापौर दीप चव्हाण, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजामभाई जहागीरदार,

चांद सुलताना हायस्कूलचे मुख्याध्यापक कादिर सर, आय.जी.शहा आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित शायर, कवींनी दर्जेदार रचना सादर केल्या सय्यद खलील यांनी मुहफलीसेने बिगाडे, यू मेरे चेहरे के मूकुश ही रचना सादर करीत आजच्या सामाजिक स्थितीवर प्रकाश टाकला. कमर सुरूर यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर रचना सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

बिलाल अहमद यांच्या मेरे मिया की बात निराली या हास्य कवितेने उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ पिकला. निजाम जागीरदार यांच्या मै सच बोलता गया, झुठे उठते गऐ या राजकीय व्यवस्थेवर टिपण्णी करणाऱ्या रचनेने मैफलीत रंगत आणली. मुनव्वर हुसेन यांनी राष्ट्रीय एकात्मतेवर तर पुणे येथून आलेल्या सोनू साळुंके यांनी सामाजिक वास्तविकतेवर रचना सादर केल्या.

हबीब पेंटर यांनी मराठी कविता तसेच मेरा पोट्टा सुनताईच नई ही आजच्या तरुणाईवरती भाष्य करणारी परखड रचना सादर केली. डॉ. नावेद बिजापूर यांच्या अध्यक्षतेखाली हा मुशायरा पार पडला. यामध्ये शरीफ खान, शायर मुश्ताक, असिफ सर, मुनवर अहमद यांनी देखील आपल्या रचना सादर केल्या. काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सुप्रसिद्ध शायर राहत इंदोरी यांची आजच्या राजकीय व्यवस्थेवर टिप्पणी करणार्‍या झूठोने, झुठो से कहा, सच बोलो ही रचना पेश केली.

याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. इंजि. अकील सय्यद यांनी सुरुवातीला पवित्र कुराणाचे पठण केले. प्रास्ताविक खलिल सय्यद यांनी केले. तर आभार निसार बागवान यांनी मानले. फोटो ओळी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त

अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस बळकटीकरण सप्ता अंतर्गत शहर जिल्हा काँग्रेस आणि तंजिम-ए-उर्दू-अदब यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित मुशायराच्या मैफलीचे दीप प्रज्वलन करून शुभारंभ करताना जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस अंकुशराव कांगडे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह तंजिम-ए-उर्दू-अदबचे अध्यक्ष खलील सय्यद,

ज्येष्ठ नगरसेवक नज्जूभाई पैलवान, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, माजी महापौर दीप चव्हाण, ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजामभाई जहागीरदार, चांद सुलताना हायस्कूलचे मुख्याध्यापक कादिर सर, आय.जी.शहा आदी.

Leave a Comment