Tractor Information: 50 HP मध्ये उत्तम ट्रॅक्टर घ्यायचे आहे का? जॉन डियर 5050 D चांगले राहील की न्यू हॉलंड 3630 TX प्लस! वाचा माहिती

john deer 5050 d tractor

Tractor Information:- शेतीमध्ये आता मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर होऊ लागला असून शेतीच्या पूर्वमशागती पासून तर पिकांच्या काढणीपर्यंत अनेक प्रकारची यंत्र वापरली जातात. परंतु यामध्ये ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणावर शेतीत वापरले जातात. शेती व शेतीशी संबंधित असलेले अनेक छोटी मोठी कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने सहजपणे करता येतात.

त्यामुळे आता बरेच शेतकरी शेतीच्या कामांसाठी ट्रॅक्टरची खरेदी मोठ्या प्रमाणावर करताना आपल्याला दिसून येतात. याच अनुषंगाने जर तुम्हाला देखील एखादा पॉवरफुल ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तो नेमका कोणता घ्यावा यासंबंधी बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात येतात.

त्यामुळे आपण या लेखांमध्ये जॉन डियर 5050 डी आणि न्यू हॉलांड 3630 टीएक्स प्लस या दोन्ही ट्रॅक्टरची तुलनात्मक माहिती बघणार आहोत. यामुळे तुम्हाला या दोन्ही ट्रॅक्टरमधून कोणते ट्रॅक्टर शेतीसाठी किंवा तुमच्याकरिता चांगले राहिले याची निवड करण्यास मदत होईल.

 जॉन डियर 5050 डी आणि न्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

जर आपण या दोन्ही ट्रॅक्टरची तुलना केली तर यामध्ये जॉन डियर 5050 डी ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला तीन सिलेंडर कुल्ड ओव्हर फ्लो रिझर्वोअर इंजिन मिळते व हे 50 एचपी पावर जनरेट करते. तर त्या तुलनेत न्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस ट्रॅक्टर 2991 सीसी क्षमतेच्या तीन सिलेंडरसह वॉटर कुल्ड इंजिनसह येते व ते 50 एचपी पावर जनरेट करते.

तसेच जॉन डियर ट्रॅक्टरचे कमाल पीटीओ पावर 42.5 एचपी आहे आणि त्याच्या इंजिनचा वेग 2100 rpm आहे. तर त्या तुलनेत न्यू हॉलांड ट्रॅक्टरचा कमाल पीटीओ पावर 46 एचपी असून त्याची इंजिन 2300 rpm जनरेट करते. तसेच वजन उचलण्याची किंवा लोडिंग क्षमता पाहिली तर जॉन डीअर ट्रॅक्टरची लोडिंग क्षमता सोळाशे किलो आहे तर न्यू हॉलंड 3630 एक्स प्लस ट्रॅक्टरची लोडिंग क्षमता 1700 ते दोन हजार किलो इतकी ठेवण्यात आली आहे.

 दोन्ही ट्रॅक्टरची इतर महत्त्वाची वैशिष्ट्ये

तसेच इतर वैशिष्ट्य पाहिले तर जॉन डियर 5050 डी ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला पावर स्टेअरिंग देण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच 8 फॉरवर्ड आणि चार रिव्हर्स गिअर्ससह गिअरबॉक्स देण्यात आले. तसेच न्यू हॉलांड 3630 टीएक्स प्लस ट्रॅक्टरमध्ये पावर स्टेरिंग येते आणि यामध्ये आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स/ बारा फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स गिअर्ससह गिअर बॉक्स देण्यात आलेला आहे.

जॉन डियरचा हा ट्रॅक्टर ऑइल एमर्स डिस्क ब्रेकचा येतो तर न्यू हॉलंड ट्रॅक्टरमध्ये ऑइल इमरस्ड मल्टी डिस्क ब्रेक  देण्यात आलेला आहे. जॉन डियर 5050 डी ट्रॅक्टर दोन व्हील ड्राईव्ह मध्ये येतो तर न्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्ह मध्ये येतो.

 किती आहे या दोन्ही ट्रॅक्टरची किंमत?

जर आपण या दोन्ही ट्रॅक्टरची किंमत पाहिली तर तुलनात्मक दृष्ट्या जॉन डियर 5050 डी ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत सात लाख 99 हजार ते आठ लाख 70 हजार रुपये पर्यंत ठेवण्यात आली आहे.

न्यू हॉलंड 3630 टीएक्स प्लस ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत आठ लाख वीस हजार ते आठ लाख 75 हजार रुपये आहे. वॉरंटी पाहिली तर जॉन डीअर ट्रॅक्टर वर पाच वर्षाची वारंटी देण्यात आली आहे तर न्यू हॉलंड ट्रॅक्टरवर सहा वर्षाची वारंटी देण्यात आली आहे.