Soybean Bajarbhav : ब्रेकिंग ! सोयाबीन बाजारभावात वाढ ; ‘या’ ठिकाणी सोयाबीनच्या दरात झाली 500 रुपयांची वाढ ; वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) कमालीची घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Farmer) चिंतेत भर पडली आहे.

एकीकडे सोयाबीन तेलात भरमसाठ वाढ होत आहे तर दुसरीकडे सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Market Price) वाढ पाहायला मिळत नाही. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना नेमक सोयाबीन बाजारभाव (Soybean Price) दबावात का आहेत याची कल्पना येत नाहीय.

दरम्यान आज सोयाबीनच्या (Soybean Crop) बाजारभावात थोडीशी वाढ नमूद केली गेली आहे. आज सोयाबीनच्या बाजारभावात जवळपास पाचशे रुपयांची वाढ नमूद झाली आहे. लासलगाव विंचूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज सोयाबीनला पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे.

म्हणजे या बाजारात जवळपास चारशे रुपयांपर्यंतची वाढ नमूद करण्यात आली आहे. निश्चितच सोयाबीन बाजार भावात झालेली वाढ सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना थोडी दिलासा देणारी ठरणार आहे. दरम्यान काल मध्यप्रदेश मध्ये सोयाबीनला तब्बल 6 हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजार भाव मिळाला होता. मात्र महाराष्ट्रात अजूनही सोयाबीन बाजार भावात वाढ पाहायला मिळत नाही.

आज सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल ते पाच हजार 100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सर्वसाधारण बाजारभाव महाराष्ट्रात नमूद करण्यात आला आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे,आपण रोजच सोयाबीनचा बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो.

आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजार भावाविषयी सविस्तर चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव.

 

बाजार समिती जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
22/10/2022
लासलगाव – विंचूर क्विंटल 2786 3000 5400 5000
औरंगाबाद क्विंटल 101 3500 4456 3978
कारंजा क्विंटल 5500 4010 5005 4525
अचलपूर क्विंटल 235 4000 4500 4250
राहता क्विंटल 76 3900 4950 4500
नागपूर लोकल क्विंटल 5067 4350 5330 5085
वडूज पांढरा क्विंटल 100 5000 5200 5100
अकोला पिवळा क्विंटल 3123 3550 5105 4460
भोकरदन पिवळा क्विंटल 55 4200 4300 4250
भोकर पिवळा क्विंटल 684 3202 5109 4155
हिंगोली- खानेगाव नाका पिवळा क्विंटल 1119 4000 5000 4500
मलकापूर पिवळा क्विंटल 2625 3925 5121 4600
मनवत पिवळा क्विंटल 233 3900 4850 4325
देउळगाव राजा पिवळा क्विंटल 85 3500 5000 4500
नादगाव खांडेश्वर पिवळा क्विंटल 481 4475 4955 4715
उमरखेड पिवळा क्विंटल 170 5000 5200 5100
उमरखेड-डांकी पिवळा क्विंटल 1040 5000 5200 5100
भंडारा पिवळा क्विंटल 70 4100 4700 4605
झरीझामिणी पिवळा क्विंटल 104 4400 4700 4580