Soybean Market Price : सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण! ‘या’ बाजार समितीत सोयाबीनच्या दरात 800 रुपयांची झाली घसरण, वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : महाराष्ट्रात सोयाबीन या नगदी पिकाची (Cash Crops) मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन (Soybean Crop) या मुख्य पिकावर अवलंबून असते.

अशा परिस्थितीत सोयाबीन लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्र महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय असल्याचे आपल्या लक्षात आले असेल. मित्रांनो देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.

देशात सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर विराजमान असून त्यापाठोपाठ महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर विराजमान आहे. यामुळे राज्यातील बहुतांश शेतकरी नेहमीच सोयाबीनच्या बाजार भावाकडे (Soybean Rate) बारीक लक्ष ठेवून असतात.

अशा परिस्थितीत आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीनचे बाजारभाव रोजच घेऊन हजर होत असतो. आज रविवार असल्याने राज्यातील केवळ दोन एपीएमसीमध्ये सोयाबीनचा लिलाव होतो. आज राज्यातील उदगीर आणि सिल्लोड या दोन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचा लिलाव झाला. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या दोन्ही एपीएमसी मध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाविषयी सविस्तर.

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समिती :- सिल्लोड एपीएमसीमध्ये आज मात्र पाच क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त 5 हजार 200 रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळाला असून कमीत कमी बाजार भाव 5 हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1395 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 680 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून किमान बाजार भाव 5 हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे. आज या एपीएमसीमध्ये सर्वसाधारण बाजारभाव 5 हजार 640 रुपये एवढा राहिला आहे.

निश्चितचं सिल्लोड एपीएमसीमध्ये मिळालेल्या सोयाबीनच्या कमाल बाजारभावात तब्बल 800 रुपयांची घसरण झाली आहे. मित्रांनो कालपर्यंत 6 हजाराच्या आसपास असणारा सोयाबीन आता पाच हजार 200 रुपये प्रति क्विंटलवर आला आहे. यामुळे निश्चितच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची घोर निराशा होत असल्याचे चित्र आहे.