Soybean Rate : बळीराजा सुखावला ! महाराष्ट्रात सोयाबीन 6 हजार पार ; वाचा आजचे बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Rate : आज सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मधून एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे. या एपीएमसी मध्ये आज सोयाबीनच्या कमाल बाजारभावाने सहा हजाराचा पल्ला गाठला आहे.

आज झालेल्या लिलावात या बाजारपेठेत सोयाबीनला 6291 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी काळात सोयाबीन दरात अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.

दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 832 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4411 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5461 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5300 नमूद झाला आहे.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये आज 41 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजारभाव 5400 नमूद झाला आहे.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज चार हजार 400 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेपाच हजार रुपये फक्त तेवढा किमान दर मिळाला असून 5551 रुपये प्रति क्विंटल एवढ्या कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५५२० रुपये नमूद झाला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 107 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये वरती घेऊन त्याला किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी भाव 5450 नमूद झाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती एपीएमसी मध्ये आज ६०५७ क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5407 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर पाच हजार 303 रुपये नमूद झाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसी मध्ये आज १२५८ क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लीलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4400 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5442 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव पाच हजार 182 रुपये नमूद झाला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1850 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5 हजार 695 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5372 रुपये नमूद झाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- कोपरगाव एपीएमसी मध्ये आज 372 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5557 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५३४० रुपये नमूद झाला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसीमध्ये आज २१५८४ क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5151 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 6291 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५६०० रुपये नमूद झाला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 8208 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. हाच झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5700 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 नमूद झाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 5108 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5460 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5300 नमूद झाला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 1933 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4851 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5601 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5226 नमूद झाला आहे.

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये चार हजार 907 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावा त्या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5521 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5055 नमूद झाला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 6000 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आता झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार 750 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5600 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5200 नमूद झाला आहे.