श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी रोड परिसरात राहणारे रामदास भिमराव कडनोर, वय ३४ यांचा टणक हत्याराने डोक्यात मारहाण करुन खून करण्यात आला.
हा खुन करुन रामदास कडनोर यांचा मृतदेह प्रवरा कॅनॉलमध्ये वाहत्या पाण्यात टाकून देण्यात आला. हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी वार्ड नं. २ येथील पाटाच्या पाण्यात हा मृतदेह आढळला व खुनाचा प्रकार उघड झाला. त्यावेळी घटनास्थळी डिवायएसपी मदने, पोनि बहिरट, सपोनि पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
पाण्यातून रामदास कडनोर या इसमाचा मृतदेह पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
तेव्हा रामदास यांच्या डोक्यात काहीतरी लोखंडी हत्याराने मारुन डोके फोडून खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. पो. ना. अमोल जाधव यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३०२ प्रमाणे काल खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.नि. बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली स पो नि पाटील हे खून करणाऱ्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
- ‘ही’ ट्रिक्स वापरा आणि 1 मिनिटात ओळखा की दुधात युरियाची भेसळ आहे की नाही! वाचा कशी वापराल ट्रिक्स?
- कॉंग्रेसने ८० वेळा घटनेमध्ये बदल केलाय, संविधानाचा खरा सन्मान भाजपनेच केला ! खा. सुजय विखेंनी इतिहासच सांगितला..
- Multibagger Stocks : 56 पैशांवरून 100 रुपयांवर पोहोचला ‘या’ कंपनीचा शेअर, आता कंपनी देणार बोनस!
- BH नंबर प्लेट म्हणजे नेमके काय? काय असतात तिचे फायदे? कोण घेऊ शकतो हा नंबर? वाचा महत्वाची माहिती
- Ahmednagar News : चार दिवसांपूर्वी लग्न, पूजेच्याच दिवशी नवरदेव गायब ! ‘अशा’ अवस्थेत सापडला मृतदेह, अहमदनगर हळहळलं..