शेवगाव :- तालुक्यातील खामगाव येथील शुभांगी राजू शिंदे (वय – 14 ) या शालेय विद्यार्थिनीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला.
रविवारी दि.21 रोजी दुपारी 2:45 च्या सुमारास घडली. रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे शुभांगी आई व बहिणीसोबत शेतात कपाशी खुरपणी करत होती.
मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे मायलेकी घराकडे आडोशाला जात असताना वीज कडाडून शुभांगीच्या अंगावर कोसळली यामध्ये तिचा मृत्यू झाला.
शुभांगी शेवगाव येथील आबासाहेब काकडे विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होती.
माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना घटनेची माहिती कळताच घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्तेसह मदत केली.
सदर मुलीचा मृतदेह 108 रुग्णवाहिकेतून शेवगाव येथील शासकीय आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
रात्री उशिरा शुभांगी च्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
- Ahmednagar News : नगर पाथर्डी बस व वऱ्हाडाच्या टेंपोचा भीषण अपघात ! पाच जखमी
- शेवया, वडे, वेफर्स, पापड्या, कुरडयांच्या निर्मितीसाठी महिलांची लगबग
- रणरणत्या उन्हातही बहरला गुलमोहर !
- Ahmednagar Politics : सभेला माणसे देता का माणसे ! एकामागे तीनशे रुपयांचा भाव, गर्दीसाठी एजंटांची नियुक्ती? धक्कादायक वास्तव
- भंडारदऱ्याच्या पाण्यातून नेवाशातील बंधारे भरावे