कोविड नियमांचे पालन करून तात्काळ शाळा सुरू करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून शाळा सुरु कराव्यात,जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संदर्भातील बंद असलेली बी डी एस प्रणाली तात्काळ सुरु करावी,इयत्ता सहावी ते आठवीला शिकवणाऱ्या सर्वच पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करावी, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन निश्चितीत एक जानेवारी दोन हजार चार नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांच्या वेतननिश्चितीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाच्या सहाव्या दिवशीच नववधू दागिने घेऊन पसार !

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  मुलाच्या कुटुंबीयांकडून मध्यस्थाने १ लाख ७० हजार रुपये घेऊन एका मुलीशी लग्न लावून दिले गेले होते. मात्र, सहाच दिवसांत रक्षाबंधनाच्या सणासाठी माहेरी जात असल्याचे सांगून नववधू अंगावरील सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह पसार झाली. लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या महिलाही आता पसार झाल्या आहेत. नेवासे येथील रहिवासी संतोष उत्तम बोडखे (३२) … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार ७९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ९०१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

प्रवरेच्या प्रवरेच्या आयात कामगारास डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी काळे फासलेआयात कामगारास डॉ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांनी काळे फासले

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  डॉ.बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे मागील ५ वर्षातील थकीत देणी मिळविण्यासाठी विविध आंदोलन करून प्रवरेच्या कामगारांना चले जावचा इशारा देऊनही संलग्न संस्थेत कामावर आलेल्या हिशोबनिस अविनाश खर्डे यास संतप्त कामगारांनी काळे फासून निषेध व्यक्त केला. शुक्रवारपासून कामगारांची मुलेही आंदोलनात सहभागी होऊन तहसिल कार्यालयामोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 901 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

ऑनलाईन अहमदनगर डान्स आयडॉल स्पर्धेचे आयोजन लहान मुलांसाठी क्यूट बेबी कॉन्टेस्ट

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- सेवाप्रित सोशल फाऊंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ऑनलाईन अहमदनगर डान्स आयडॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच लहान मुलांसाठी क्यूट बेबी कॉन्टेस्ट घेण्यात येत आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थी व पालकांना सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय व उपाध्यक्षा तथा ग्रुप लीडर डॉ. सिमरनकौर वधवा यांनी … Read more

कोरोनाच्या संकटकाळात नगरकरांनी मोठ्या संयमाने लढा दिला -आमदार संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- कोरोना महामारीत माणुसकीच्या भावनेने सर्व समाजाने योगदान दिले. शहरात लंगर सेवेने गोर-गरीब व वंचितांना आधार दिले. कोरोना काळात राजकारण बाजूला ठेऊन माणुसकीच्या भावनेने कार्य करण्यात आले. या संकटकाळात नगरकरांनी देखील मोठ्या संयमाने लढा दिल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. कोरोनाच्या संकटकाळात शहरात उत्तम पध्दतीने नियोजन करुन कोरोनाचे … Read more

आ. संग्राम जगताप यांनी आयटीपार्कच्या नावाखाली तरुणाईला गंडा घालत फसवणूक केली

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आ. संग्राम जगताप यांनी आयटी पार्कच्या नावाखाली मोठा ढोल बडवत नगर शहराला हैदराबाद, पुणे, बंगलोरच्या धर्तीवर आयटी हब करणार असा कांगावा करत तीन हजार पेक्षा जास्त तरुण-तरुणींच्या मुलाखती आपल्या स्वतःच्या आयुर्वेद येथील खाजगी कार्यालयात घेतल्या. यातील अनेकांना नोकऱ्या पण दिल्या. पण आता ज्यांना … Read more

मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी १६ महिला नगरसेवकांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यपदी १६ महिला नगरसेवकांची बुधवारी नेमणूक करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे 5, शिवसेना 5, भारतीय जनता पक्ष 4, काँग्रेस व बसप प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी काँग्रेस इच्छुक असली, तरी शिवसेनेने या पदासाठी मोर्चेबांधणी केली आहे.सभापती निवडीसाठी प्रस्ताव विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार … Read more

लसीकरणामध्ये गुरुजी ठरले अग्रेसर; जिल्ह्यात ९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :-आठवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू केल्यानंतर आता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शासनस्तरावर तयारी सुरू आहे. त्याअनुषंगाने ५ सप्टेंबरपर्यंत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. दरम्यान, एक दिलासादायक बाब म्हणजे नगर जिल्ह्यात ९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यामुळे शाळा … Read more

‘त्या’ घटनेमुळे महापालिकेचे कामकाज बुधवारी बंद ठेवण्यात आले

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- ठाण्यात महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्याचा राज्यभर निषेध करण्यात येऊ लागला आहे. याचेच काहीसे पडसाद नगर जिल्ह्यात देखील पडलेले दिसून आले आहे. ठाणे महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदनगर महापालिकेचे कामकाज बुधवारी बंद ठेवण्यात आले होते. कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी सकाळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना काम बंद ठेवून … Read more

उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ; घरांसह दुकानांवर डल्ला मारत लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- नगर शहरासह जिल्ह्यात चोरटयांनी हौदास माजवला आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली असून यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकतेच नगर शहरातील नागापूर उपनगरातील पितळे कॉलनीत मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरटयांनी एकाचवेळी दोन घरे, किराणा दुकान व मेडिकल फोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिणे असा एकूण दोन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ७३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १२ हजार १०७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी पूरस्थितीत दुचाकीवर प्रवास करीत वाड्या-वस्त्यांवर जाऊन साधला शेतकऱ्यांशी संवाद

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  नगर तालुक्यातील जेऊर बायजाबाई परिसरात काल रात्री जोरदार पाऊस झाला.स्थानिकांच्या मते ढगफुटीसदृश पाऊस होता यामुळे जेऊर परिसरातील 12 वाड्या वस्त्यांवर पुराच्या पाण्याने अहकार माजवला त्यामध्ये वाड्या वस्त्यांना जोडणारे पूल वाहून गेले याच बरोबर शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच जेऊर बाईजाबाई गावामध्ये व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या दुकानात मध्यरात्री … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- हवामान खात्याने जिल्ह्यात २ दिवसात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने प्रवरा, मुळा व म्हाळुंगी नदीकाठच्या नागरिकांना स्थानिक प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. अतिवृष्टी झाल्यास नदी, ओढे-नाले वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. पूल-नाल्यावरुन पाणी वाहत असल्यास ओलांडण्याचा प्रयत्न करु नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करु नये. धोकादायक इमारतींचा आश्रय घेऊ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 736 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –   अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सामाजिक संस्था मानव सेवेतून परिवर्तन घडवतील -ऍड. मेहेरनाथ कलचुरी

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-   सामाजिक संस्था मानव सेवेतून परिवर्तन घडवतील. मानवसेवा हीच खरी ईश्‍वरसेवा आहे. कोरोना महामारीत या गोष्टींचा सर्वांना अनुभव आला, मनुष्यच मनुष्याच्या मदतीसाठी धावून आला. माणुसकीचे दर्शन आपल्या कृतीतून दाखवून दिले तर समाजात शांतता व समृद्धी निर्माण होईल, असे प्रतिपादन अवतार मेहेरबाबा ट्रस्टचे संचालक ऍड. मेहेरनाथ कलचुरी यांनी केले. जय … Read more

मागासवर्गीयांवर जातीय अत्याचाराच्या घटना वाढत असताना तातडीने उपाययोजना कराव्या

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-  महाराष्ट्रात मागासवर्गीयांवर जातीय अत्याचाराच्या घटना दिवसंदिवस वाढत असून, यावर तातडीने उपाययोजना कराव्या, अन्यथा महाराष्ट्र दलित अन्याय अत्याचारग्रस्त घोषित करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने करण्यात आली. तसेच बोरगाव माळवाडी येथे मातंग समाजातील मयत व्यक्तीच्या मृतदेहाची जातीय कारणातून विटंबना झालेल्या घटनेचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर निषेध … Read more