जिल्हा परिषदेच्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण द्या! ‘या’ जिल्हा परिषद सदस्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- सध्या करोनाची दुसरी लाट आल्याने अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे. त्यानंतर तिसऱ्या लाटेचाही इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्वतोपरी प्रयत्न चालू असून, अधिकारी-कर्मचारी या कामात अहोरात्र व्यस्त आहेत. सध्या संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्व्हेक्षण करण्यात येते. हे जोखमीचे काम करणाऱ्या … Read more

कोरोनाचा धोका वाढत असताना गेल्या आठ दिवसांपासून लसीकरण ठप्प

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा वाढता धोका पाहता सुरुवातीस लसीकरण मोहीम वेगाने राबवण्यात आली. मात्र आता पुन्हा एकदा लसीकरण मोहीम थंडावली आहे. यातच जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण महत्वाचे असताना जिल्ह्यात लसीचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प झाले आहे. यामुळे भविष्यात धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली … Read more

बालरोगतज्ञांची टास्कफोर्स स्थापन करा’ …! मनपा आयुक्तांकडे ‘यांनी’ केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, त्यावर विविध उपाययोजना करणे गरजेच्या आहेत. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी लसीकरणाला महत्त्व देण्यासाठी आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व १७ प्रभागांमध्ये लसीकरण केंद्रे सुरू करावी, तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मानवी जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे. या कोरोना संकट काळामध्ये नागरिक भयभीत झाले आहेत. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! वाळू तस्करी करणारे ढंपर दिले पेटवून

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव परिसरात गोदावरी नदीपात्रातून वाळू तस्करी सुरु आहे. दरम्यान या नदी पात्रात वाळूतस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती डीवायएसपी संदीप मिटके व तहसीलदार पाटील यांना मिळाली. तातडीने पोलीस व महसूल प्रशासनने घटनास्थळी धाव घेत नदीपात्रात तीन वाळु गाड्या पकडल्या. एक गाडी नदीपात्रातून बाहेर काढून ती पोलीस स्टेशनला आणण्याचे … Read more

कुकडीचे पाणी वेळेत न आल्याने पिके जळाली

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कर्जत तालुक्यात आतापर्यंत कुकडीचे एकच आवर्तन आल्याने तालुक्यातील ऊस, कांदा, कलिंगड तसेच फळबागा व पालेभाज्या जळून गेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात कुकडीची तीन ते चार आवर्तने सुटायची. त्यानुसार शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे नियोजन केले. मात्र पाण्याअभावी पिके जळून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कोलमडलेल्या कुकडी आवर्तनाच्या नियोजनामुळे कर्जत … Read more

लक्ष द्या ! बँकेची ही सेवा उद्या काही तास बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- देशाची सर्वोच्च बँक आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँकेतर्फे आज एक महत्वपूर्ण सूचना करण्यात आली आहे. यानुसार काही तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी सिस्टीम अपडेट केले जाणार आहेत. त्यामुळे उद्या २३ मे रोजी काही तासांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर अर्थात NEFT सेवा बंद असणार आहे. याबाबतची माहिती आरबीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली … Read more

रिमांड होममधून अल्पवयीन मुलास पळविले!

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- येथील रिमांड होम बालगृहातील एका अल्पवयीन(वय११वर्षे) मुलास अज्ञाताने पळवून नेले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील रिमांड होम बालगृहात असलेल्या मुलांना जेवणासाठी सोडले होते. नंतर मुले हे जेवण करून झाल्यानंतर हात धुण्यासाठी नळावर गेले असता किरण गोविंदा रेड्डी (वय ११वर्ष,रा. शिमोगाए, जिल्हा चीपमंगरूळ) या मुलास कोणीतरी अज्ञात इसमाने … Read more

प्रवरा कोव्‍हीड सेंटरला १० लाख रुपयांची मदत !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- कृषि उत्‍पन्‍न बाजार समि‍तीने शासन निर्देशाप्रमाणे आपल्‍या उत्‍पन्‍नातून १० लाख रुपयांची मदत प्रवरा कोव्‍हीड सेंटरला केली आहे. या रक्‍कमेचा धनादेश बाजार समितीच्‍या पदाधिका-यांनी आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍याकडे सुपूर्त केला. विविध दानशुर व्‍यक्‍ती आणि संस्‍थानी एकुण १४ लाख रुपयांची मदत या कोव्‍हीड सेंटरसाठी उपलब्‍ध करुन दिली आहे. कृषि उत्‍पन्‍न बाजार … Read more

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- आंतरराष्ट्रीय पातळीवर खतासाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली, तरीही डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी १४ हजार ७७५ कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकऱ्यांना गेल्या वर्षीच्या जुन्याच भावाने हे रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घेतला. या निर्णयाबद्दल भाजप व सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आपण पंतप्रधान मोदी यांचे … Read more

निळवंडेची पाहणी करून जलसंपदामंत्री म्हणाले कि निळवंडे कालव्यांची कामे….

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरणा कालव्यांच्या कामासाठी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचा अगदी दररोज पाठपुरावा असून 2022 च्या मध्यापर्यंत प्रकल्पाचे पूर्ण काम मार्गी लागून लाभक्षेत्रात पाणी देण्याचा प्रयत्न राहील. या कामासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असा विश्वास राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार जयंत … Read more

नेहमीच इतरांवर अवलंबून राहत असाल , तर होऊ शकतो हा आजार , लक्षणे ओळखणे आणि करा उपचार

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  इतरांवर नेहमीच अवलंबून राहण्याच्या सवयीमुळे भविष्यात डीपीडी म्हणजे डिपेंडेंट पर्सलिटी डिसऑर्डर नावाची मानसिक समस्या उद्भवू शकते. असे लोक इतरांच्या सल्ल्याशिवाय लहान कामेदेखील करत नाहीत, ज्यामुळे स्वतःवरील आत्मविश्वास कमी होतो आणि भविष्यात बर्‍याच समस्या निर्माण होतात. डीपीडी रोगाची प्रमुख लक्षणे :- लाजाळूपणा भावनात्मकता आत्मविश्वासाचा अभाव निर्णय घेताना घाबरणे याची … Read more

म्युकरमायकोसिसचा धोका टाळण्यासाठी वाचा ही महत्वाची माहिती !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  आता देशात म्युकरमायकोसिस म्हणजेच काळ्या बुरजीच्या आजाराने थैमान घातलं आहे. देशात वेगवेगळ्या भागात काळ्या बुरशीच्या आजाराचे आतापर्यंत 8,848 प्रकरण समोर आली आहेत. तर 200 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक राज्यांनी या आजाराला महामारी घोषित केली आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसने सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. कोविड१९च्या काळात … Read more

बांधावरून दोन गटांत हाणामारी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे सामायिक बांधाच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याने राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. महिलेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, २० मे रोजी दुपारी माझे पती व मुलगा आपल्या शेताच्या बांधावर पाहणी करत असताना त्यांना सामायिक बांधावरील गवत, झुडपे ही जाळून टाकलेली दिसून आली. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! जाणून घ्या जिल्ह्यातील आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 1856 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  (ही बातमी आताच ब्रेक झाली आहे,सविस्तर अपडेटसाठी कृपया काहीवेळाने पेज रिफेश करा ) अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

दुसर्‍या लाटेतही बुथ हॉस्पिटल कोरोनाच्या लढ्यात पाय घट्ट रोवून अनेकांचे जीव वाचवत आहे !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- शरद पवार विचार मंचच्या वतीने कोरोना रुग्णांना आधार देत निस्वार्थपणे आरोग्यसेवा पुरविणार्‍या सॅलवेशन आर्मी संचलित बुथ हॉस्पिटलला अंड्याचे ट्रे व पाणी बॉटलच्या बॉक्सची मदत देण्यात आली. शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष अल्ताफ सय्यद यांनी हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे ही मदत सुपुर्द केली. यावेळी भैय्या बॉक्सर, नदीम सय्यद, … Read more

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘ह्या’ मतदारसंघातून निवडणूक लढविणार ?

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पोटनिवडणुकीतील विजयाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी भवानीपूरचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नंदीग्राममध्ये बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना नियमाप्रमाणे सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक जिंकणे अनिवार्य आहे. तरच त्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर राहू शकतील. तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष … Read more

विनाकारण फिरणाऱ्याची कोरोना चाचणी !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- श्रीगोंदा तालुक्यात दररोज कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत असताना देखील नागरीक शासकीय नियमानाचे पालन न करता विनामास्क, तसेच विनाकारण रस्त्यावर फिरत असल्याने श्रीगोंदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह विनाकारण फिरणाऱ्यां नागरीकांची कोरोना चाचणी केली. तर शहरात ४ विनापरवानगी चालु असलेल्या दुकानांवर … Read more

‘बाजार समिती बंद’मुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान ! 

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  सध्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे नगर बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत . यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठे नुकसान होत आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून बाजार समितीतील शेतीमालाचे व्यवहार सुरू करण्याची बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे . यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात … Read more