Electric Tractor : 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तास चालतील हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर! वाचा त्यांची किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Tractor :- वाढती महागाई आणि इंधनाचे दर यामुळे सध्या दुचाकी असो की चार चाकी यामध्ये इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा कल सध्या वाढताना दिसून येत आहे. कृषी क्षेत्राच्या बाबतीत विचार केला तर ट्रॅक्टर हे यंत्र मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. अगदी जमिनीची पूर्व मशागती पासून ते पिकांची काढणीपर्यंत ट्रॅक्टरचा विविध मार्गाने उपयोग होत असतो. परंतु गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या डिझेलच्या दरांमुळे ट्रॅक्टर वापराचा खर्च देखील वाढलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा साहजिकच उत्पादन खर्चामध्ये वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर जर इतर वाहनांसारखे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या कामाला आले तर खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. यात इलेक्ट्रिक ट्रॅक्टरच्या सहाय्याने काम केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा तर होणारच आहे परंतु पर्यावरणासाठी देखील ते चांगले आहेत. बाजारामध्ये काही कंपन्यांचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आलेले आहेत परंतु त्यातील काही महत्त्वाचे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर बद्दल आपण या लेखांमध्ये माहिती घेणार आहोत.जे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असून परवडणाऱ्या किमतींमध्ये मिळणारे आहेत.

 हे तीन इलेक्ट्रिक ट्रॅक्टर शेतकऱ्यांना ठरतील फायद्याचे

1- ऑटोनेक्स्ट ऑटोमेशन कंपनीचे X45H2 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर इलेक्ट्रिक ट्रॅक्टर तयार करणाऱ्या नामवंत अशा आऊटोनेक्स्ट ऑटोमेशन या कंपनीने नुकताच X45H2 लॉन्च केला असून हे एक महत्वपूर्ण ट्रॅक्टर असून यामध्ये दोन चार्जिंग पर्याय देण्यात आलेले आहेत. केवळ फास्ट चार्जिंग पर्यायाचा वापर करून अवघ्या दोन तासांमध्ये हे ट्रॅक्टर पूर्णपणे चार्ज होते. विशेष म्हणजे दोन तास जलद चार्जरने चार्जिंग केल्यानंतर आठ तास हे शेतात काम करू शकते. ऑटोनेक्स्ट  या कंपनीचे अनेक इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे मॉडेल सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

2- सोनालीका टायगर 11HP- सोनालीका टायगर 11HP हे देखील शेतकऱ्यांना फायदेशीर ट्रॅक्टर असून आकाराने अतिशय कॉम्पॅक्ट असे ट्रॅक्टर आहे. त्यामुळे फळबागातील महत्त्वाची कामे करण्यासाठी हे ट्रॅक्टर खूप उपयुक्त आहे. या ट्रॅक्टरमध्ये 25.5 किलोवॅटची नॅचरल कूलिंग बॅटरी देण्यात आली आहे.

या बॅटरीला चार्ज होण्यासाठी दहा तास लागतात. परंतु या ट्रॅक्टरमध्ये जलद चार्जिंगचा पर्याय देण्यात आला असल्यामुळे तो चार तासात पूर्णपणे या ट्रॅक्टरला चार्ज करतो. या चार्जिंग पॉवरमध्ये ते आठ तास आरामात काम करू शकते. या ट्रॅक्टरची किंमत सहा लाख 40 हजार ते सहा लाख 72 हजार रुपये आहे.

3- एचएव्ही हायब्रीड ट्रॅक्टर( इलेक्ट्रिक आणि डिझेलवरही चालतो)- एचएव्ही हे देशातील पहिले हायब्रीड ट्रॅक्टर असून ते विजेवर आणि डिझेल किंवा सीएनजी सारखे इंधनावर देखील चालते. या एचएव्ही ट्रॅक्टर सिरीजमध्ये दोन प्रकारचे मॉडेल आहेत. यातील 50 एस 1 हे मॉडेल डिझेल हायब्रीड आहे.  हे मॉडेल  इलेक्ट्रिक आणि डिझेलवर चालते. तर 50 एस 2 हा सीएनजी ट्रॅक्टर असून तो डिझेल तसेच सीएनजी वरही चालू शकतो. या ट्रॅक्टरची किंमत आठ लाख 50 हजार रुपयांपासून पुढे सुरू होते.