Agriculture News : ब्रेकिंग! शिंदे सरकारचा मोठा निर्णय! गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन देणार 75 हजार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Agriculture News : खरीप हंगामात (Kharif Season) या वर्षी सोयाबीन पिकात (Soybean Crop) वातावरण बदलामुळे वेगवेगळ्या रोगांचे सावट बघायला मिळाले. याशिवाय खरीप हंगामातील सोयाबीन समवेतच सर्व मुख्य पिकांवर गोगलगाय कीटकाचे देखील मोठे सावट होते.

गोगलगाई या कीटकांमुळे शेतकरी बांधवांच्या (Farmer) पिकांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. मित्रांनो खरे पाहता गोगलगाय कीटकामुळे (Snail) संपूर्ण महाराष्ट्रात खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले आहे.

मात्र गोगलगाईमुळे बीड, लातूर आणि उस्मानाबाद या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत ज्या शेतकरी बांधवांच्या पिकांचे गोगलगाई मुळे नुकसान झाले आहे अशा शेतकरी बांधवांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र शासन गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई (Compensation to farmers) देणार आहे. नुकसान झालेल्या शेतकऱी बांधवांच्या पिकांचे पंचनामे करून मदतीसाठी तात्काळ प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवावे असे आदेश शासनाकडून जारी करण्यात आले आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यासह उर्वरित महाराष्ट्रातील एकूण 1 लाख 63 हजार 889 हेक्टर क्षेत्र गोगलगाय किटकामुळे (snail) बाधित झाले असून शेतकरी बांधवांना यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

अशा परिस्थितीत संबंधित शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवावा असे राज्य शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. मित्रांनो याबाबत अधिक माहिती अशी की, ज्या शेतकऱ्यांचे गोगलगाय किटकामुळे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनामे करून मदतीसाठीचे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त व संबंधित जिल्हा प्रशासनास देण्यात आले आहेत.

मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार, गोगलगाय किटकामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाणार आहे. यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. मित्रांनो खरं पाहता, शेतकऱ्यांचे गोगलगायी कीटकांमुळे लाखोंचे नुकसान झाले आहे मात्र माय-बाप शासन नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे यावेळी बघायला मिळतं आहेत.