Farmer Success Story : कौतुकास्पद! या प्रयोगशील शेतकऱ्याने 2 एकरात पेरू लागवड केली, तब्बल 24 लाखांची कमाई झाली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव (Farmer) गेल्या अनेक दशकांपासून शेती मध्ये (Farming) मोठा बदल करत आहेत. मित्रांनो फळबाग लागवड हा देखील अशाच एक बदलाचा भाग आहे. राज्यातील शेतकरी बांधव पेरू, द्राक्ष, केळी, सीताफळ नव्हे नव्हे तर आता सफरचंद देखील लागवड करू लागले आहेत.

विशेष म्हणजे यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई (Farmer Income) होत आहे. मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील (Solapur) शेटफळ येथील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील काळाच्या ओघात बदल करत उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने पेरू (Guava Crop) या फळबाग पिकाची शेती केली आहे.

या प्रयोगशील शेतकऱ्याने (Progressive Farmer) पेरू लागवडीच्या माध्यमातून तब्बल चोवीस लाखांची कमाई करण्याची किमया साधली आहे. त्यामुळे सध्या हा अवलिया चर्चेचा विषय बनला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याच्या शेटफळ येथील दत्तात्रेय लबडे या प्रयोगशील शेतकऱ्याने 4 वर्षांपूर्वी पेरू लागवड करण्याचे ठरवले.

या अनुषंगाने या शेतकऱ्याने मध्यप्रदेश राज्यातून व्ही एन आर जातीची रोपे मागवली. मित्रांनो व्ही एन आर या जातीच्या पेरूची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. यामुळे त्यांनी या जातीची निवड केली आहे. मध्य प्रदेश राज्यातून रोपे मागवल्या नंतर या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतात पेरूची लागवड केली.

आतापर्यंत या प्रयोगशील शेतकऱ्याने दोन एकर पेरूच्या बागेतून दोनदा यशस्वी उत्पादन घेतले आहे. आता तिसरे उत्पादन त्यांना मिळत असून सध्या काढणी सुरू आहे. आतापर्यंत त्यांनी 20 टन पेरूचे उत्पादन विक्री केली असून त्यांना 85 रुपये प्रति किलोचा बाजार भाव मिळाला आहे. अशा पद्धतीने त्यांना 14 लाख रुपयांचे उत्पन्न आत्तापर्यंत मिळाले आहे.

त्यांना अजून दहा टन पेरूचे उत्पादन अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत त्यांना 24 लाख रुपयांची कमाई होण्याची आशा आहे. मित्रांनो या प्रयोगशील शेतकऱ्याने स्थानिक व्यापाराच्या माध्यमातून केरळमधील व्यापार्याला आपल्या पेरूची विक्री केली आहे. मित्रांनो त्यांनी पेरूचे फळ खराब होणे या अनुषंगाने क्रॉप कव्हर आणि पॉलिथिन बॅगचा उपयोग केला आहे.

यामुळे पेरूचे दर्जेदार उत्पादन मिळाले असून यामुळे रोगराई पेरूच्या बागेवर आली नसल्याचे त्यांचे मत आहे. खरं पाहता गेली दोन दोन वर्ष देखील त्यांना पेरूच्या बागेतून चांगले उत्पादन मिळाले होते. मात्र त्यावेळी त्यांना अपेक्षित असा बाजार भाव मिळाला नाही.

मात्र या हंगामात त्यांनी उत्पादित केलेल्या पेरूला चांगला बाजार भाव मिळाला आहे. निश्चितच या प्रयोगशील शेतकऱ्याने केलेला हा शेतीमधला प्रयोग इतरांसाठी प्रेरणा देणारा सिद्ध होणार आहे.