Farming Business Idea : कोण म्हणत शेती फक्त तोट्याची ! 2 हजार रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या ‘या’ पिकाची लागवड करा, 6 लाखापर्यंत कमाई होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farming Business Idea : आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधव काळाच्या ओघात मोठा बदल करत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव आता वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव आता वेलची लागवड देखील करू लागले आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की वेलची हे पीक केरळ कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यातच फक्त उत्पादित केले जात होते. मात्र आता महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून वेलचीचे पिक आपल्या राज्यातही उत्पादित करून दाखवले आहे.

विशेष म्हणजे राज्यातील शेतकरी बांधव वेलचीच्या पिकातून चांगली कमाई करत आहेत. मित्रांनो जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करण्याचा सल्ला देतात. जाणकार लोकांच्या मते शेतकरी बांधवांनी शेतीतून चांगली कमाई करण्यासाठी पीक पद्धतीत मोठा बदल केला पाहिजे. अशा परिस्थितीत वेलचीच्या पिकाची शेती करून शेतकऱ्यांना बक्कळ नफा मिळण्याची शक्यता आहे.

मित्रांनो कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलचीची लागवड १०-३५ डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या भागात केली पाहिजे. तापमानात वेलचीची पिके वेगाने विकसित होत असल्याने या पिकातून चांगले उत्पादन मिळण्याची शक्यता असते. तसेच शेतकरी बांधवांना या पिकाची लागवड करायची असल्यास त्यांनी काळी चिकणमाती असलेल्या जमिनीत वेलचीची लागवड केली पाहिजे. अशा जमिनीत वेलची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अधिक उत्पादन प्राप्त होत असते.

पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या काळ्या जमिनीवरही वेलची ची लागवड केली जाऊ शकते. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, वेलचीची लागवड रोपे तयार करून केली जाते. यासाठी सर्वप्रथम वेलचीची रोपे रोपवाटिकेत तयार केली जातात. जाणकार लोकांच्या मते, एक हेक्टरसाठी वेलचीची रोपे तयार करण्यासाठी एक किलो वेलची बियाणे पुरेसे असते.

वेलची लागवड केल्यानंतर दोन वर्षांनी या पिकापासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. मित्रांनो कृषी क्षेत्रातील एक्सपर्ट लोकांनी सांगितल्याप्रमाणे, वेलची पिकाची योग्य काळजी घेतली, योग्य पोषण व्यवस्थापन केले तर हेक्टरी 150 किलो वेलचीचे उत्पादन मिळू शकते.

वेलचीची शेती शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे कारण की वेलची बाजारात खूपच महाग विकली जाते. बाजारात वेलचीला 1000 ते 2000 हजार रुपये प्रतिकिलो पर्यंतचा दर मिळत आहे. जर शेतकरी बांधवांनी योग्य काळजी घेतली तर त्यांना एक हेक्टर क्षेत्रातून वेलची पिकातून तब्बल तीन लाखांची कमाई होऊ शकते. अशा पद्धतीने पाच एकर क्षेत्रात शेतकऱ्यांनी वेलची पिकाची लागवड केल्यास त्यांना सहा लाखांपर्यंत सहज कमाई होणार आहे.