Mansoon 2022: पंजाबरावांचा 2022 चा मान्सून अंदाज जाहीर, वाचा काय म्हणतायेत डख

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Mansoon Update: सध्या संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधव मान्सूनची (Mansoon) चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या सुधारित अंदाजानुसार मान्सूनचा प्रवास हा संथ गतीने सुरू असून महाराष्ट्रात मान्सून आगमनास उशीर होणार आहे.

मात्र असे असले तरी भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) येत्या पाच दिवसात राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा देखील दिला आहे.

आता आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक कमावलेल्या पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांचा देखील मान्सून बाबतचा अंदाज समोर आला आहे.

पंजाबराव डख यांच्या मते, मान्सून राजधानी मुंबईत 6 जूनला म्हणजे आज येणार आहे आणि 7 जूनला बहुतांशी भागात मान्सून (Mansoon Rain) हा पोहोचणार आहे.

तसेच 15 जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची (Rain) हजेरी बघायला मिळणार आहे. याशिवाय पंजाबरावं यांनी दावा केला आहे की, 22 जून पर्यंत संपूर्ण भारतात पाऊस कोसळणार आहे.

यामुळे शेतकरी बांधवांच्या पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत एवढे नक्की.तीन वर्षात मान्सूनच्या पावसाचं प्रमाण वाढलं असं का घडलं?गेल्या काही वर्षात पंजाबराव डख यांनी हवामानाचा अचूक अंदाज वर्तवत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या तसेच जनतेच्या मनात विश्वासाहर्ता निर्माण केली आहे.

शेतकरी बांधव डख यांच्या अंदाजावर आपले शेतीचे नियोजन आखत असतात. यामुळे पंजाबराव डख यांच्या हवामान अंदाजाकडे सर्वांचे लक्ष लागून असते. पंजाबराव डख यांनी सांगितले की, गत तीन वर्षांपासून मान्सून हा पूर्व दिशेकडून दाखल होत आहे.

यामुळे गेल्या तीन वर्षात पावसाच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. यावर्षी देखील मान्सून हा पूर्वेकडून दाखल झाला आहे यामुळे यंदाचा मान्सून काळात पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे सांगितले गेले आहे.

मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात एका कार्यक्रमादरम्यान पंजाबराव डख उपस्थित असताना त्यांनी हा अंदाज सार्वजनिक केला आहे.

निश्चितच मान्सून बाबत दिलेल्या पंजाबराव डख यांच्या या अंदाजामुळे मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.