Soybean Farming: पावसाळ्यात शेतकरी लखपती बनणार..! सोयाबीन शेतीतून मिळणार 10 लाखापर्यंत उत्पन्न; मात्र, ही काळजी घ्यावी लागणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Farming: सोयाबीन (Soybean) हे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. सोयाबीनची सर्व भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आपल्या राज्यातही सोयाबीन लागवड (Soybean Cultivation) विशेष उल्लेखनीय आहे. सोयाबीनची शेती मुख्यतः खरीप हंगामात (Kharif Season) केली जाते.

मात्र यावर्षी राज्यातील शेतकरी बांधवांनी (Farmer) उन्हाळी हंगामात देखील सोयाबीनची शेती यशस्वी करून दाखवली आहे. खरं पाहता, सोयाबीन खरीप हंगामातील एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. याची पावसाळ्यात पेरणी करून भरघोस उत्पादन शेतकरी बांधव मिळवत असतात.

देशातील अनेक राज्यांमध्ये सोयाबीनची लागवड केली जात असली तरी याची सर्वाधिक लागवड मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यात केली जाते. हे केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नाही तर त्यावर प्रक्रिया करून तुम्ही सोया दूध, सोया पनीर आणि सोया वडी बनवून देखील अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता.

सोयाबीनची पेरणी कशी करणार बर?

चिकणमाती असलेली शेतजमीन सोयाबीनच्या शेतीसाठी सर्वोत्कृष्ट असल्याचा दावा कृषी तज्ञ करत असतात. सोयाबीनची पेरणी पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत करावी असा सल्ला दिला जातो. शेतातील पाण्याचा निचरा झाल्यामुळे जमिनीत ओलावा राहतो आणि अतिरिक्त पाणी शेताबाहेर जाते. यामुळे सोयाबिनच्या उत्पादनात भरीव वाढ होते.

परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील लाखो रुपयांची वाढ होते. सोयाबीनची पेरणी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करावी असा सल्ला दिला जातो. म्हणजेच आता जर सोयाबीनची पेरणी केली तर निश्चितचं शेतकऱ्यांना निश्‍चितच मोठा फायदा होणार आहे. खरं पाहता या कालावधीत पेरणी केल्यास पावसामुळे सोयाबीनला जास्त सिंचनाची गरज भासत नाही आणि पीक 50-145 दिवसात उत्पादन देण्यास तयार होते.

खर्च आणि उत्पन्न

तज्ज्ञांच्या मते, एक एकर क्षेत्रात सोयाबीनचे सुधारित वाण वाढवून 40 ते 45 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. उत्तर प्रदेशातील एक यशस्वी शेतकरी 25 एकरमध्ये सोयाबीनची लागवड करत आहे, ज्यामुळे त्याला एका वर्षात 10 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. खर्चाबाबत बोलायचे झाले तर बियाणे खरेदीपासून ते काढणीपर्यंत 70 हजार ते 1 लाख रुपये खर्च येतो. योग्य पाऊस आणि काळजी घेतल्यास नफा आणि उत्पादन वाढते.

ही खबरदारी घ्या लाखों कमवा 

•सोयाबीनची खरीप हंगामात शेती करताना सुरुवातीपासून काढणीपर्यंत अनेक खबरदारी घेणे आवश्यक असते.

•अनेकदा पिक कुजल्यामुळे बुरशीजन्य रोग होतात, त्यापासून मुक्त होण्यासाठी शेत तयार करण्याबरोबरच पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.

•सोयाबीन हे तेलबिया पीक आहे, ज्यामध्ये कीटक आणि रोग होण्याचा धोका असतो, त्याच्या प्रतिबंधासाठी, निंबोळी कीटकनाशकापासून बनवलेल्या सेंद्रिय कीटकनाशकाने नियंत्रणाचे काम करा.

•सोयाबीनचे सह-पीक सोयाबीन आणि इतर भाज्या आणि भरड धान्यांच्या लागवडीसह अधिक फायदे देते.

•सहपीक म्हणजेचं आंतरपीक शेती करून लागवडीचा खर्च वसूल केला जातो, ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळण्यास मदत होते.