भावा-बहिणीच्या जोडीची कमाल ! औषध फवारणी करण्यासाठी तयार केलं अद्भुत कृषी ड्रोन, शेतकऱ्यांचा होणारा फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story : शेती (farming) हे जोखिम पूर्ण क्षेत्र आहे. शेती करताना शेतकरी बांधवांना (Farmer) अनेक संकटांचा सामना करावा लागतो. शेती पिकांना विविध प्रकारच्या कीटकांपासून वाचवण्यासाठी तसेच रोगराई पासून वाचवण्यासाठी आणि चांगले भरघोस उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी बांधवांना शेती पिकांवर वेगवेगळ्या कीटकनाशकांची (pesticide) फवारणी (Spray) करावी लागते.

पिकापासून चांगले उत्पादन घेण्यासाठी वेगवेगळ्या बुरशीनाशकांची तसेच टॉनिकची देखील पिकांना आवश्यकता असते. अनेकदा औषध फवारणी करताना शेतकरी बांधवांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. विशेषता कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी बांधवांना विषबाधा सारख्या समस्या भेडसावत असतात.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्यता असते. आता यावर उपाय म्हणून जळगाव मधील एका भावा-बहिणीच्या जोडीने औषध फवारणीसाठी कृषी ड्रोनची (Farming Drone) निर्मिती केली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील भावा-बहिणीच्या जोडीने तयार केलेले हे महाकृषी ड्रोन (Agriculture Drone) शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पाचोरा येथील आशिष प्रताप राजपूत आणि त्यांची बहीण रजनी धनराज राजपूत यांनी औषध फवारणी साठी ड्रोन (Drone Invention) तयार करण्याची किमया साधली आहे. त्यामुळे या दोन्ही भावा-बहिणीची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा रंगली आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आशिष आणि त्यांची बहीण रजनी दोन्ही उच्चशिक्षित आहेत आशिष यांनी इलेक्ट्रिकल इंजीनियरिंगचे शिक्षण घेतला आहे तर त्यांच्या बहिणीने कंप्यूटर इंजीनियरिंगचे शिक्षण ग्रहण केले आहे.

आशिष सांगतात की लग्नसमारंभात वापरल्या जाणाऱ्या व्हिडिओ शूटिंगच्या ड्रोन वरून त्यांना औषध फवारणी साठी आपण देखील असा ड्रोन तयार केला पाहिजे अशी कल्पना सुचली. आशिष यांच्या मते हा ड्रोन तयार करण्यासाठी त्यांना तीन लाख 50 हजार रुपये खर्च आला आहे. विशेष म्हणजे या ड्रोन मध्ये 11 लिटर क्षमतेची औषध टाकी बसविण्यात आली असून हा ड्रोन अवघ्या दहा मिनिटात एक एकर क्षेत्रावर फवारणी करण्यास सक्षम आहे.

आशिष यांच्या मते आता साडेतीन लाख रुपयात हा ड्रोन तयार झाला आहे. मात्र भविष्यात यापेक्षाही स्वस्तात ड्रोन कशा पद्धतीने तयार केला जाऊ शकतो यावर ते संशोधन करत आहेत. रजनी यांनी सांगितले की, आम्हीदेखील शेतकऱ्याची लेक आहोत. अशा परिस्थितीत आम्हाला शेती करताना शेतकरी बांधवांना कोणकोणत्या कष्टाला सामोरे जावे लागते याची पूर्ण कल्पना आहे.

त्यामुळे आम्ही शेतकरी बांधवांना औषध फवारणी कमी वेळेत करता यावी आणि आपला जीव धोक्यात न घालता फवारणी करता यावी यासाठी हा कृषी महा ड्रोन तयार केला आहे. निश्चितच या शेतकऱ्याच्या पोरांनी केलेली ही कामगिरी कौतुकास्पद असून सध्या या दोघा बहीण भावाची महाराष्ट्रभर चर्चा रंगली आहे.