“70 ते 80 टक्के शिवसैनिक भाजप सोबतच राहतील”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक (Kolhapur North Assembly Election) लागली आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) ने या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप आणि काँग्रेसचा जरी उमेदवार उभा असला तरी मात्र टीकास्त्र शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये रंगताना दिसत आहे.

शिवसेना जरी महाविकास आघाडी सरकार मध्ये असली तरी शिवसेनेचे कार्यकर्त्ये काँग्रेसला मतदान करणार का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यातच भाजप नेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी मोठे विधान केले आहे.

प्रवीण दरेकर प्रचारादरम्यान म्हणाले, कडवट शिवसैनिक कधीही काँग्रेसला मतदान करणार नाहीत. 70 ते 80 टक्के शिवसैनिक भाजप सोबतच राहतील असा विश्वास दरेकर यांनी केला आहे.

प्रचार सभेनंतर प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले, शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी पत्करली आहे.

हे पाहून बाळासाहेबांनाही दुःख होत असेल, असं सांगत सगळ्या शिवसैनिकांना (Shiv Sainik) भाजपला मतदान करायला सांगा. तुमची सगळी जबाबदारी आम्ही घेऊ असे आव्हान प्रवीण दरेकर यांनी शिवसेना कार्यकर्त्याला केले आहे.

काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपवर सडकून टीका केली आहे. त्या म्हणाल्या, भाजपवर मला युपीतल्या उन्नाव परिसरात जायला भीती वाटली. कारण का तिथं योगीचं सरकार आहे.

तसेच तिथल्या उमेदवाराला बोलता येत नाही, अशी परिस्थिती आहे. उमेदवाराला तिनशे पोलिसांची सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्र तसं नाही, तुम्ही सभेला येताना, किंवा रात्र झाली म्हणून घाबरत नाही. कारण हा महाराष्ट्र आहे. इथं अशा घटना घडत नाहीत. असे प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत.