“मी राजभवनाला इशारा देतो. राजभवनाने या भानगडीत पडू नये”

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा चालू आहे. भाजप (BJP) नेते किरीट (kirit somaiya) सोमय्या महाविकास आघाडीतील नेत्यांमागे हातधुवून लागल्याचे दिसत आहेत. अशातच शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी राजभवनाला (Raj Bhavan) आणि राज्यपालांना गंभीर इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या हे वारंवार महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या विरोधात ईडीकडे (ED) तक्रार करत आहेत.

तसेच आघाडीतील नेत्यांवर गंभीर आरोप देखील करत आहेत. संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यामधील आरोपांचे सत्र हे सध्यातरी थांबताना दिसत नाही.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, किरीट सोमय्यांना अटक होऊ नये म्हणून त्यांच्या माफिया टोळीचे प्रयत्न सुरू आहेत. कालपासून राजभवनात (raj bhavan) सोमय्यांच्या माफिया टोळीचे लोक जात आहेत.

जुन्या तारखेचे कागदपत्रं तयार करत आहे. मी राजभवनाला इशारा देतो. राजभवनाने या भानगडीत पडू नये. देशविरोधी कृत्यात सामील होऊ नये. अन्यथा राजभवनाची इभ्रतही जाईल असा गंभीर इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

सोमय्या आणि त्यांच्या टोळीने लोकांची फसवणूक केली आहे. त्यांनी केलेला हा घोटाळा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. त्याची व्याप्ती मोठी आहे. राज्याबाहेरही या घोटाळ्याचं लोण आहे.

त्यामुळे हे दोन्ही लफंगे बापबेटे लपून बसले आहेत. अंतरीम जामीन मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. केंद्रातून सेटिंग करत आहेत. मात्र, त्यांना जामीन मिळणार नाही असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

एक माफिया गँग आता बोगस पुरावे तयार करत आहे. मी राजभवनाला इशारा देतो जर चुकीचं काम केलं तर राजभवनाची उरलेली इभ्रतही संपेल.

सोमय्यांना वाचवण्याचे खूप प्रयत्न होत आहेत. पण गुन्हेगार कुठेही असो मुंबई पोलीस त्यांना पकडणारच असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांनीही माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मी पोलीस तपासाबाबत बोलणार नाही. पोलीस त्यांचा तपास करत आहे. काही लोकांची चौकशीही सुरू झाली आहे, असं सांगतानाच अजूनही काही प्रकरणे बाहेर येणार आहे असा छातीठोक दावाही सोमय्यांनी केला आहे.

सेव्ह विक्रांतच्या नावावर जो घोटाळा झाला तो काही छोटा घोटाळा नाहीये. त्याची व्याप्ती मोठी आहे. पूर्ण महाराष्ट्रातून पैसा गोळा करण्यात आला. किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी ही वसुली केली. त्यांची माफिया टोळी आहे. बिल्डरांकडूनही ते पैसे जमा करतात.

इतर राज्यातूनही पैसा गोळा केला. त्याचा गैरव्यापर झाला आहे. इओडब्ल्यूकडे हा गुन्हा वर्ग केला आहे. कालपासून स्टेटटमेंट सुरू झालं. असं कळलं. मी काही पोलिसांचा प्रवक्ता नाही असे संजय राऊत म्हणाले आहेत.