‘मी इथेच फाशी घेईन’, आमदार रवी राणांनी दिला आत्महत्येचा इशारा

 

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News:-  अमरावती पालिका आयुक्तांवर शाईफेक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजप आमदार रवी राणा यांनी सोमवारी विधिमंडळाच्या परिसरात राज्य सरकारचा निषेध केला.

तसेच यावेळी त्यांनी थेट फाशी घेण्याचा इशारा दिला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्रकरणावर रवी राणा यांचा खुलासा ‘शिवरायांचा पुतळा आम्ही बसवला आणि दुग्धाभिषेक झाला.

शिवप्रेमींनी आराधना केली आणि पाच दिवसानंतर उड्डाणपुलावरुन पुतळा काढून टाकण्यात आला. छन्नी आणि हातोड्याने हा पुतळा काढण्यात आला आणि गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला.

आमच्या आराध्य दैवताला गोडाऊन टाकत असतील तर शिवभक्तांच्या भावना दुखावतीलच. पण काही शिवभक्तांनी मनपा आयक्तांवर शाई फेकली, तेव्हा मी दिल्लीत होतो.

मला बैठकीत असताना फोन आला आणि तुमच्यावर अमरावतीत ३गुन्हा दाखल झाल्याचं सांगण्यात आलं’ असा खुलासा रवी राणा यांनी केला आहे.

तसेच पुढे बोलताना राणा म्हणाले की, ‘पोलीस आयुक्त सांगतात, सरकारमधल्या लोकांनी हा गुन्हा दाखल करायला लावला. यानंतर १०० ते १५० पोलीस घरी गेले, वृद्ध आई होते, घरात घुसून तपासणी केली.

खासदारांचाही अपमान करण्यात आला. या राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी आयुक्तांना फोन केला आणि गुन्हा दाखल करायला लावला. आरती सिंग पोलीस आयुक्त आहेत.

त्यांनी माझ्यावर रात्री साडेदहा वाजता गुन्हा दाखल झाला. त्यासाठी आमच्यावर दबाव असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितलं. यामुळे जर न्याय मिळाला नाही तर मी इथेच फाशी घेईल’ असा इशारा त्यांनी केला आहे.