पुणतांब्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- राहाता तालुक्यात पुणतांब्यात दोघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे. याप्रकरणी राहाता तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या घटनेत राहाता तालुक्यातील विजया राजेंद्र कोळपेकर (वय 60) या त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या.

त्यांना तातडीने उपचारासाठी शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासले असता उपचारापूर्वीच विजया राजेंद्र कोळपेकर यांचा मृत्यू झालेला होता.

याप्रकरणी राहाता पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसर्या घटनेत तालुक्यातील पुणतांबा गावातील

कृषी विद्यापीठाच्या शेतात चिंचेच्या झाडाला धनंजय सुरेश थोरात (वय 23) याने गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला.

त्याला उपचारासाठी पुणतांब्याच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच तो मयत झालेला होता. राहाता पोलिसांनी आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.