CNG-PNG rates: या शहरात सीएनजी आणि पीएनजीचे वाढले दर, अचानक दर वाढण्याचे काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

CNG-PNG rates: जागतिक बाजारपेठेत (Global market) गॅसच्या वाढत्या किमतीचा भारतातील ग्राहकांवर परिणाम होत आहे. गेल्या काही महिन्यांत देशात सीएनजी, पीएनजी आणि एलपीजीच्या किमती अनेक वेळा वाढवण्यात आल्या आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबई (Mumbai) करांसाठी एक वाईट बातमी आहे.

मुंबईत पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात (CNG-PNG rates) वाढ करण्यात आली आहे. सीएनजी आणि पीएनजीच्या वाढलेल्या किमती आजपासून लागू झाल्या आहेत.

मुंबईत सीएनजी-पीएनजीच्या किमती वाढल्या आहेत –

सरकारी मालकीची गॅस वितरण कंपनी महानगर गॅस लिमिटेडने (Mahanagar Gas Limited) मंगळवारी मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली होती.

कंपनीने सांगितले होते की, शहरातील सीएनजीच्या दरात प्रति किलो 4 रुपये आणि पीएनजीच्या दरात प्रति एससीएम 3 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की गॅसच्या बाबतीत वाढती इनपुट कॉस्ट (Input cost) आणि रुपयाची सतत घसरण यामुळे सीएनजी-पीएनजीच्या किमतीत वाढ करणे भाग पडले आहे.

यासाठी कंपनी बाहेरून गॅस खरेदी करते –

महानगर गॅस लिमिटेड देशांतर्गत बाजारपेठेत किरकोळ विक्रीसाठी इतर देशांकडून योग्य प्रमाणात गॅस खरेदी करते. मागणीच्या तुलनेत घरगुती गॅसचे वाटप कमी असल्यामुळे हे घडले आहे. या कारणास्तव जागतिक गॅसच्या किमती आणि रुपयाचे मूल्य यावर थेट परिणाम होतो.

दरवाढीनंतर आता मुंबई आणि परिसरात सीएनजीचा दर 80 रुपये किलो झाला आहे. त्याचप्रमाणे, पीएनजीची नवीन किंमत प्रति मानक घनमीटर 48.50 रुपये झाली आहे.

गॅसच्या किमती, पुरवठ्यावर सरकारचे नियंत्रण –

उदारीकरणानंतरही नैसर्गिक वायूच्या (Natural gas) किमती आणि पुरवठ्यावर सरकारचे नियंत्रण आहे. सरकार वर्षातून दोनदा गॅसच्या किमती आणि पुरवठा होणारे प्रमाण ठरवते. केंद्र सरकारने 1 एप्रिलनंतर देशांतर्गत आणि आयातित नैसर्गिक वायूच्या किमतीत 110 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे.

त्यामुळे राज्य सरकारांनी 1 एप्रिलनंतरची व्हॅटमध्ये केलेली कपात कुचकामी ठरली आहे. राज्य सरकारांनी या कालावधीत गॅसवरील व्हॅटचे दर 3.5 टक्क्यांवरून 13.5 टक्क्यांवर आणले आहेत.