“आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्याचा धंदा”; नाना पटोलेंची घणाघाती टीका

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : गेल्या काही दिवसापासून भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे महाविकास आघडीच्या मंत्र्यांच्या मागे हात धुवून लागलेले दिसत आहेत. किरीट सोमय्या आघाडीतील मंत्र्यांवर घोटल्याचे गंभीर आरोप करत आहेत. आता काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनीही किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

राज्यात महाविकास आघडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप (BJP) असे टोकाला गेलेले राजकारण पाहायला मिळत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा आघाडीतील नेत्यांच्या मागे लागला आहे.

तर महाविकास आघाडीकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. भाजप सुडाचे राजकारण करत आहे. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप भाजपवर करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात आयकर विभाग (Income Tax) आणि ईडीचे (ED) धाडसत्र सध्या सुरु आहे. यावरूनच आरोप प्रत्यारोपाचे सत्र राज्यात सुरु आहे. नाना पटोले यांनी भाजप नेत्यांवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

नाना पटोले म्हणाले, किरीट सोमय्या यांनी नारायण राणे (Narayan Rane) व कृपाशंकर सिंह (Krupashankar Singh) यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपाचे पुढे काय झाले? ज्यांच्यावर आरोप केले जातात ते भाजपात गेले की पवित्र होतात का?

असा प्रश्न विचारत मुख्यमंत्र्यांच्या राजीनामाची मागणी पटोले यांनी धुडकावून लावली. किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत केलेल्या आरोपातील किती आरोप सिद्ध झाले.

आरोप करणे व लोकांची बदनामी करणे हा किरीट सोमय्याचा धंदा आहे असे म्हणत नाना पटोले यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.

https://twitter.com/NANA_PATOLE/status/1506511915031351299?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1506511915031351299%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fpolitics%2Fnana-patole-criticizes-kirit-somaiya-over-actions-of-ed-and-income-tax-department-669075.html

देशात महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढ, शेतकरी, कामगार यांचे महत्वाचे प्रश्न आहेत, या महत्वाच्या मुद्द्यावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे बेछूट आरोप करण्यात येत आहेत.

भाजपचा हा आरोप-आरोपांचा खेळ लोकांच्या लक्षात आला आहे. दररोज महाविकास आघाडींच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून महाराष्ट्र भ्रष्टाचारी राज्य असल्याचे प्रतिमा करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे परंतु जनता भाजपाचा हा खेळ ओळखून आहे असे म्हणत पटोलेंनी भाजपवरही टीका केली आहे.