Nokia T21: बेस्ट डिस्प्ले आणि मोठ्या बॅटरीसह नोकियाचा नवीन टॅबलेट लॉन्च ; जाणून घ्या किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nokia T21 :  नोकियाने (Nokia) आपला नवीन टॅबलेट (new tablet) Nokia T21 लॉन्च केला आहे. हा टॅबलेट कंपनीने मागच्या वर्षी लॉन्च केलेल्या T20 चा उत्तराधिकारी म्हणून सादर केला आहे.

या टॅबमध्ये 10.36-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आणि UNISOC T612 प्रोसेसरसाठी सपोर्ट आहे. तसेच, टॅबमध्ये 64 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे.

मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. टॅबला 8200mAh बॅटरी आणि फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट देखील मिळतो.

नोकिया टी21 ची किंमत
हा नोकिया टॅबलेट सिंगल चारकोल ग्रे रंगात लॉन्च करण्यात आला आहे. त्याची किंमत 239 युरो (सुमारे 19,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. Nokia T21 1 सप्टेंबरपासून निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल.

नोकिया T21 चे स्पेसिफिकेशन
Nokia T21 मध्ये 10.36-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, जो 2000 x 1200 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 400 nits पीक ब्राइटनेससह येतो. टॅबलेटला UNISOC T612 प्रोसेसरसह Mali-G57 ग्राफिक्स मिळतात.

64 जीबी रॅमसह फोनमध्ये 128 जीबी स्टोरेज सपोर्ट करण्यात आला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

हा फोन अँड्रॉइड 12 वर चालतो आणि कंपनी दोन वर्षांसाठी अँड्रॉइड अपडेट्स आणि तीन वर्षांसाठी सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे. म्हणजेच, तुम्हाला Android 12 सोबत 13 आणि Android 14 मिळू शकतात.

नोकिया T21 कॅमेरा
टॅबलेटमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा सपोर्ट करण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. टॅबच्या कॅमेऱ्यासोबत एलईडी फ्लॅशसाठी सपोर्टही देण्यात आला आहे.

नोकिया T21 बॅटरी
Nokia T21 टॅबलेटमध्ये 8200mAh बॅटरी आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. टॅबमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी NFC, स्टिरीओ स्पीकर आणि 3.5mm जॅक सपोर्ट करण्यात आला आहे. तसेच टॅबला धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP52 रेटिंग मिळते.