पोलिसांनी टोळक्याला चोप देताच जमावाकडून पोलिसांना धक्काबुक्की

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- संगमनेर शहरातील तीन बत्ती चौकात विनाकारण फिरणाऱ्या टोळक्याला पोलिसांनी चोप दिला, मात्र काही वेळातच संतप्त जमावाने गोळा होत पोलिसांना धक्काबुक्की करत त्यांच्या वाहनावर दगडफेक केली.

या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या पार्शवभूमीवर जमावबंदी असतानाही शहरातील या ठिकाणी गर्दी होत असते.

यावेळी बंदोबस्तास असलेल्या अहमदनगर येथील दंगल नियंत्रण पथकातील पोलिसांनी त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न केला. या पथकातील काही कर्मचार्‍यांनी नागरिकांना चांगला चोप दिला.

घटनेची माहिती समजताच परिसरातील सुमारे 200 नागरिक घटनास्थळी जमा झाले. संतप्त जमावाने पोलिसांचे वाहन अडविले. त्यांनी पोलिसांना मारहाणीबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी जमावातील काही जणांनी दोघा पोलिस कर्मचार्‍यांना मारहाण केली. संतप्त जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक सुरू केली. रस्त्यावरून जाणार्‍या एका वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.

जमावाचा रुद्रावतार पाहून पोलीस अधिकार्‍यासह पोलीस कर्मचार्‍यांनी तेथून वाहनासह काढता पाय घेतला. नागरिकांना पोलिसांनी मारहाण करू नये असे

आदेश गृहमंत्र्यांनी दिलेले असतानाही संगमनेरात मात्र या आदेशाचे पालन होतांना दिसत नाही. पोलीस अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|