रोहित पवार म्हणतात, पार्थ आणि माझं नातं कसं ते आम्हाला माहिती

 

अहमदनगर Live24 टीम, 15 मे 2021 :- पार्थ आिण माझ्या मतभिन्नता असल्याचा प्रचार प्रसारमाध्यमांनी केला होता. प्रसारमाध्यमांना पण बातम्या देणारे कदाचित विरोधक असतील. विरोधकांकडून त्या पुड्या सोडण्यात येत होत्या.

व्यक्तिगत स्तरावर आम्हाला दोघांना ठाऊक आहे आमचं नातं कसं आहे, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले. आमदार रोहित पवार यांनी त्यांचे चुलत बंधू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यासंदर्भात प्रथमच आपली मतं एक मुलखतीत व्यक्त केली.

आमदार पवार म्हणाले, पार्थ मनाने खूप चांगला आहे, पण निर्णय घेताना कधीकधी अचानक निर्णय घेण्याचा प्रयत्न करतो. पार्थशी माझे संबंध चांगलेच आहेत. माझा भाऊ आहे. मी त्याच्यापेक्षा थोडासा वयाने मोठा आहे. लहानपणी आम्ही एकत्र क्रिकेट खेळायला जायचो, कधी ट्रॅक्टरमधून फिरायला जायचो.

दिवाळी यायची तेव्हा अजितदादा आमच्यासाठी पोतं भरुन फटाके आणायचे. मग आम्ही सर्व भावंड दिवाळीला एकत्र जामयचो तेव्हा ते फटाके वाटून घ्यायचो आणि नंतर एकत्र फोडायचो,” अशा जुन्या आठवणी त्यांनी सांगितल्या.

पार्थ मनाने फार चांगला आहे. निर्णय घेताना कधीकधी तो अचानक निर्णय घेण्याचा प्रयत्न तो करतो. पण आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा एकमेकांसोबत विनोद करणं. भावंडं म्हणून एकमेकांची चेष्टा मस्करी करणं, हे सारं आम्ही करत असतो, असेही आमदार पवार म्हणाले. पार्थ पवार हे सक्रिय असतात.

मावळ मतदारसंघामध्ये फिरत असतात. तिथले पदाधिकारी, आपला आमदार त्या ठिकाणी आहे. जेव्हा त्यांना एखादी अडचण येते किंवा काही विषय अजित पवारांपर्यंत न्यायचे असतात तर त्या ठिकाणी पार्थ पुढाकार घेतो.

काम होणं महत्वाचं आहे. काहीजण सोशल नेटवर्किंगवर सक्रीय असतात. काम जास्त हायलाइट करुन दाखवत असतात. तो दाखवत नसले. प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी असते, असेही आमदार रोहित पवार म्हणाले.