Sanjay Raut : “भाजप सूडानं वागतंय, भविष्यात एकत्र येणं शक्य नाही”; संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नागपूर : शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप (BJP) शिवसेना (Shivsena) युतीवर मोठे भाष्य केले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भविष्यात युती होणार नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

संजय राऊत म्हणाले की, भविष्यात शिवसेना-भाजप (Shivsena-BJP) एकत्र येणार नाही. एखादी भूमिका घेतली की त्यावरून शिवसेना मागे येणार नाही.

ज्या पद्धतीनं 25 वर्ष एकत्र काम केलं. ते विसरुन भाजप सूडानं वागतंय. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

संजय राऊत यांच्या या विधानामुळे भविष्यात भाजप आणि शिवसेनेची युती होणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. तसेच शिवसेना आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) सोबतच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

भाजपचा भगवा आहे की नाही? भगव्याचा दांडा फक्त आमचाच आहे. भाजपचा आहे की नाही माहित नाही असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, जीना यांनी एक फाळणी केली तुम्ही रोज फाळणी करता, असा टोला लगावतानाच एमआयएमशी आघाडी होणार नाही. हे सांगणारा मी पहिला माणूस आहे.

एमआयएमने उत्तर प्रदेशात भाजपची बी टीम म्हणून काम केलं. त्यामुळे समाजवादी पार्टीचं मोठं नुकसान झालं. मतांची आकडेवारी पाहिल्यावर एमआयएम (MIM) कुणासाठी काम करते हे दिसून येतं असेही संजय राऊत म्हणाले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपचा मार्गदर्शक आहे. मग आमचे मार्गदर्शक का नाही? आम्ही मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांना भेटणार, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.

किमान समान कार्यक्रमावर राज्यात सरकार बनले आहे. कुणीही आपला पक्ष इतर पक्षात विलीन केला नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे,

असं सांगतानाच महाविकास आघाडीने एकत्र मनपा निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे. पण तसं झाले नाही. तर आम्ही स्वबळावर लढू असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.