Vikhe Patil : साईबाबांचे दर्शन घेऊन विखे मुंबईला रवाना, लाल दिवा घेऊनच येणार?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vikhe Patil :  प्रदीर्घकाळ रखडलेल्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of the State Cabinet) मंगळवारी किंवा बुधवारी केला जाणार असल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. त्या दृष्टीने मुंबईत (Mumbai) वेगाने हालचाली सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

संभाव्य यादीतील नेत्यांना निरोप गेल्याचे सांगण्यात येते. नगर जिल्ह्यातून भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) मुंबईला रवाना झाले आहेत. विखे पाटील यांनी आज शिर्डीत साई समाधीचे दर्शन (Sai Baba) घेतले.

त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले आहेत. मुंबईहून बैठकीचा निरोप आल्याने ते रवाना झाल्याचे सांगण्यात येत असले तरी विखे पाटील मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे विस्ताराच्या पहिल्याच यादीत त्यांने नाव असणार, अशी समर्थकांना खात्री आहे.

त्यामुळे उद्या किंवा परवा विस्तार झालच तर विखे पाटील येताना लाल दिव्याची गाडी घेऊनच येणार. येणाऱ्या स्वातंत्र्यदिनी नगरमधील मुख्य ध्वजवंदनांचा कार्यक्रम पालकमंत्री म्हणून त्यांच्यात हस्ते होणार, अशी आता समर्थकांना खात्री वाटू लागली आहे. मुंबईत तशा अनुकून घडामोडी सुरू झाल्याने याला दुजोराही मिळत आहे.