डॉ. आंबेडकर यांचा अवमान ; ‘ह्या’ गावात तणाव, दोन दिवसीय बंद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध म्हणून हे गाव दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

गावातील प्रवेशद्वाराजवळ असलेल्या सार्वजनिक मुतारीतील आतील बाजूच्या भिंतीवर अज्ञात समाज कंटकाने काळ्या रंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत आक्षेपार्ह लिखाण करून अवमान केला.

हे उघडकीस आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. याबाबत अविनाथ बाळासाहेब आहिरे, रा. धामोरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध भा.दं.वि.कलम 295 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके करत आहेत. गावातील परिस्थिती तणावपूर्ण असून पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. तणावपूर्ण वातावरणात पोलिसांनी ग्रामस्थ व भीमसैनिक यांच्यासमवेत चर्चा केली.

दोन दिवसांत या घटनेचा तपास करून आरोपीस अटक करण्याचे आश्वासन दिले. यावेळी या घटनेच्या निषेधार्थ धामोरी ग्रामस्थांनी दोन दिवस गाव बंद पाळण्याचे घोषित केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment