निवडणुकीचे बिगुल वाजले! या तीन नगरपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहीर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :- देशात कोरोनाचे संकट आहे मात्र नुकतीच देशात बिहार निवडणुकीचे रणशिंग फुकले आहे. आता नगर जिल्ह्यातील   तीन नगरपंचायतींचा निवडणुकांसाठीचा प्रभाग रचना कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. 

नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये मुदत संपणाऱ्या नगर परिषद व नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका अधिनियमातील दुरुस्तीनुसार घेणे आवश्‍यक आहे. या निवडणुकांसाठी नगर परिषद,

पंचायतींची प्रभाग रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातील पारनेर, कर्जत व अकोले या तीन नगर परिषदांचा समावेश आहे. असा असणार निवडणूक कार्यक्रम

  •  21 ऑक्‍टोबरपर्यंत प्रभाग रचनेचे प्रस्ताव सादर करणे
  • 29 ऑक्‍टोबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देणे
  • 03नोव्हेंबरला सदस्य पदांच्या आरक्षण सोडतीसाठी नोटीस प्रसिद्ध होणार
  • 10 नोव्हेंबरला नगरपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
  • 18 ते 26 नोव्हेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचना, प्रभाग दर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणवर हरकती मागविण्यात आल्या आहेत.
  • 10 डिसेंबरला हरकतींवर सुनावणी होणार आहे.
  • 17 डिसेंबरला अंतिम प्रभाग रचना मंजूर करण्यात येणार आहे.
  • 24 डिसेंबरपर्यंत अधिसूचना स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment