कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  खेळता खेळता कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडून चार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हि घटना संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मालुंजे शिवारात निळवंडे कालव्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. दरम्यान हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरून गेले होते.

२० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास मालुंजे येथील घुगे वस्तीवरील युवराज बबन घुगे (वय – ४) हा चिमुकला खेळता – खेळता वस्ती लगत असलेल्या निळवंडे कालव्यासाठी खोदलेल्या खड्यात पडला व पाण्याने भरलेल्या खड्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

त्यामुळे अर्धवट काम झालेल्या निळवंडेच्या खड्याने बबन घुगे याच्या मुलाचा बळी घेतला आहे. तसेच निळवंडे कालव्यासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदून काम अपूर्ण अवस्थेत ठेवल्यामुळे लोकांमध्ये संतापाची भावना उमटली आहे.

निळवंडे कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडल्यामुळे स्थानिक ग्रामस्थं आक्रमक झाले आहेत. भविष्यात अशा दुर्देवी घटना घडू नये यासाठी सबधित ठेकेदाराने खड्याभोवती सुरक्षेच्या दृष्टिकोणातून जाळी बसवणे गरजेचे आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment