अहमदनगर :- जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारात प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
यात मुलीचा मृत्यू झाला, तर मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
अवंतिका रघुनाथ दळवी (२१, कडा, ता. आष्टी) असे मृत युवतीचे नाव असून, मुकुंद बाबासाहेब भोजने या तरुणावर उपचार सुरू आहेत. या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते.
परंतु लग्नाला घरच्यांचा विरोध होता. मंगळवारी रात्री नगर-जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारातील बंद पडलेल्या हॉटेलमध्ये त्यांनी गळफास घेतला.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, काल रात्री ते नगर जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील शिवारात असणा-या एका बंद पडलेल्या हॉटेलमध्ये गेले होते.
तेथे दोघांनी गळफास लावून घेतला. मुलाचे नातेवाईक त्यांना शोधत आले होते. त्यावेळी बंद पडलेल्या हॉटेलमध्ये ते दोघे लटकलेल्या अवस्थेत दिसले.
त्यांनी नातेवाइकांनी तातडीने दोघांना खाली घेऊन नगर येथे एका खासगी रुग्णालयात आणले. उपचारापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला आहे, तर युवक बेशुद्ध असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
- अहमदनगर स्थापना दिन विशेष लेख : आपले अहमदनगर @ ५३४ !
- गुड न्युज ! Tata कंपनी जून महिन्यात लाँच करणार ‘ही’ दमदार कार, पहा फिचर्स अन प्राईस लिस्ट
- शिंदे गटाच्या ‘या’ माजी खासदाराला भाजप राज्यपाल करणार? एका जागेच्या बदल्यात शब्द ? पहा..
- Ahmednagar News : ‘तो’ ओरडत राहिला अन हा दगडाने ठेचत राहिला.. अहमदनगरमधील ‘त्या’ हादरवणाऱ्या खुनाचा उलगडा
- Ahmednagar News : बच्चू कडूंचा अहमदनगर मनपाला दणका , ‘ते’ प्रकरण थेट विधानसभेत नेलं, नगरचे ‘बडे’ लोक अडकणार? पहा..