Budget 2024: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्प ठरेल फायद्याचा! ‘या’ 3 मोठ्या घोषणा पूर्ण झाल्या तर होईल पगारवाढ?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Budget 2024:- एक फेब्रुवारी 2024 रोजी देशाचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थसंकल्प सादर करतील व या अर्थसंकल्प सादर व्हायला आता काही  दिवस शिल्लक राहिलेले आहेत. या अर्थसंकल्पामधून सर्वसामान्य पासून तर सरकारी नोकरदारांपर्यंत सर्वांच्या विशेष अशा काही अपेक्षा आहेत.

आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये देशात लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्यामुळे हा अर्थसंकल्प अंत्रीरिम अर्थसंकल्प असणार असून यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसोबत इतर नागरिकांच्या काय अपेक्षा पूर्ण होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. कारण जर आपण निवडणुकांची पार्श्वभूमी पाहिली तर यामुळे  केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीय कर्मचाऱ्यांकरिता मोठ्या घोषणा होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

खास करून सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर सकारात्मक परिणाम करू शकतील अशा काही घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यात येतील अशी देखील शक्यता आहे. यामध्ये जर आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचे संबंधित असलेल्या घोषणांचा विचार केला तर यामध्ये फिटमेंट फॅक्टर मधील वाढ,

आठवा वेतन आयोग स्थापन करणे आणि कोरोना कालावधीत थकीत असलेल्या डीए म्हणजेच महागाई भत्ता बद्दल घोषणांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आता या अंतरीम केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये याबाबत सरकार काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

 केंद्रीय अर्थसंकल्पात होऊ शकतात या तीन घोषणा

1- होऊ शकते फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ एक फेब्रुवारी रोजी जो काही अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्यामध्ये देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगार वाढी संबंधित घोषणा करण्याची शक्यता असून गेल्या अनेक दिवसापासून सरकारी कर्मचारी संघटनेकडून याबाबत मागणी केली जात आहे. सरकारने या बजेटमध्ये फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केली तर सध्या कर्मचाऱ्यांना जे काही 18 हजार रुपये मूळ वेतन मिळत आहे ते 26 हजार रुपये पर्यंत वाढेल.

2- आठव्या वेतन आयोगाची घोषणा तसेच या अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या आठव्या वेतन आयोगाची घोषणा करेल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

आठवा वेतन आयोग स्थापनेबाबत केंद्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला तर अगदी छोट्या पदांवर काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या देखील पगारांमध्ये वाढ होणार आहे.

यापूर्वी केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोगाबाबत सध्या तरी कुठलाही विचार करत नसल्याचे सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेला आहे. परंतु आगामी येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने सरकार याबाबतीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुश करण्याच्या दृष्टिकोनातून याबाबत देखील काही घोषणा करू शकते अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

3- डीए एरियर म्हणजेच 18 महिन्यांचे डीएची थकबाकी मिळेल?- महागाई भत्त्याबद्दल पाहिले तर केंद्र सरकारच्या माध्यमातून वर्षात दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करत असते. परंतु कोविड कालावधीच्या जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात कुठल्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नव्हती

व त्यानंतर मात्र एक जुलै 2021 रोजी थेट महागाई भत्त्यामध्ये 11 टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यावेळेस  महागाई भत्ता 17 टक्क्यांवर होता व त्यात अकरा टक्क्यांनी वाढ करून तो 28% करण्यात आलेला होता. परंतु त्या कालावधीमध्ये जी काही महागाई भत्त्याची थकबाकी आहे

म्हणजेच ती 18 महिन्याची थकबाकी सरकारकडून मिळेल अशी अपेक्षा केंद्रीय कर्मचाऱ्यांना आहे. याबाबत देखील सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे की ही थकबाकी भरण्याचा कुठलाही विचार सध्या तरी नाही. परंतु या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याबद्दल काही सकारात्मक निर्णय होईल अशी शक्यता आहे.