Farmer Success Story: पुण्यात निवृत्त शिक्षकाने केली सफरचंदाची शेती यशस्वी! भविष्यात लाखोत आर्थिक उत्पन्न मिळण्याची शक्यता

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story:- शेतीमध्ये आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागल्यामुळे आणि अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून हवामान बदलाचा परिणाम कमीत कमी करण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात.

आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतीसंबंधी आधुनिक असे संशोधन झाल्यामुळे आता शेतकरी कोणत्याही पिकाची लागवड करून ते यशस्वी करताना आपल्याला दिसून येत आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मध्ये फळ पिकांमध्ये प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, संत्रा, पेरू आणि सीताफळासारख्या फळबागांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.

परंतु आता जम्मू काश्मीर आणि हिमाचल सारख्या थंड प्रदेशामध्ये येणाऱ्या सफरचंदाची लागवड देखील महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांनी यशस्वी केलेली आहे. अगदी याच पद्धतीने जर आपण  पुण्यातील एका निवृत्त शिक्षकाची यशोगाथा पाहिली तर त्यांनी देखील आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पुण्यासारख्या ठिकाणी सफरचंदाची लागवड यशस्वी केली आहे.

 पुण्यात केली सफरचंदाची लागवड यशस्वी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पुण्यातील प्रभाकर खरात हे एक निवृत्त शेतकरी असून त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करत पुण्यातील इंदापूर तालुक्यात सफरचंदाची शेती यशस्वी केलेली आहे. त्यांचे मुळगाव संसार हे असून ते सेवानिवृत्त शिक्षक तर आहेतच परंतु त्यासोबत शेतकरी देखील आहेत.

जेव्हापासून ते सेवेतून निवृत्त झाले तेव्हापासून ते शेती करत आहेत. शेतीमध्ये नेहमीच नवनवीन प्रयोग करण्यामध्ये ते कायम व्यस्त असतात. याच प्रयोगाचा भाग म्हणून त्यांनी सफरचंद लागवडीचा निर्णय घेतला व दार्जिलिंग या ठिकाणहून सफरचंदाची रोपे लागवडीसाठी खरेदी केली.

सफरचंदाची लागवड केल्यानंतर 15 ते 19 महिन्याच्या कालावधीत त्यांनी सफरचंदाचे पहिले उत्पादन यशस्वीपणे काढले. प्रभाकर खरात यांचा मोठा मुलगा किशोर यांनी या सफरचंद लागवडी मधील बारकावे समजून घेण्यासाठी जम्मू-काश्मीरला भेट दिली होती व त्या ठिकाणी त्यांनी याबाबत सविस्तर माहिती मिळवली. त्यानंतर याविषयी संपूर्ण माहिती त्यांनी वडील प्रभाकर खरात आणि भाऊ कालिदास यांना सांगितली.

त्यानंतर खास करून त्यांनी सफरचंद लागवड करण्याचा निर्णय घेतला. दार्जिलिंग येथून जी सफरचंदाची रोपे आणली त्या रोपांची लागवड त्यांनी दहा गुंठे क्षेत्रात केली. यासाठी व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून खूप काळजी घ्यावी लागली व याकरिता संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन त्यांनी याबाबतचे नियोजन केले.

पहिल्यांदा दहा गुंठे क्षेत्रामध्ये त्यांनी सफरचंदाचा यशस्वी प्रयोग केला व आता पुन्हा दहा गुंठे सफरचंद लागवड त्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षापासून ते सफरचंदाची लागवड करत आहेत. प्रभाकर खरात यांच्या सफरचंद बागेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या झाडांकरिता कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेण्यावर भर दिलेला आहे.

येणाऱ्या काळात यामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी म्हटले की सफरचंद शेती करताना सर्व आवश्यक गोष्टी लक्षात ठेवून व्यवस्थापन करणे गरजेचे असते. प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञानाचा वापर करून हिमाचल किंवा जम्मू-काश्मीर व्यतिरिक्त देखील सफरचंदाची लागवड करता येते हे प्रभाकर खरात यांनी सिद्ध करून दाखवलेले आहे.